मान धरली, किस करण्याचा प्रयत्न अन्… ऑन ड्युटी महिला पोलीस अधिकाऱ्याने ओलांडली मर्यादा
पश्चिम बंगालमधील सिलीगुरी येथे एका महिला पोलीस अधिकार्याने मद्यप्राशन केले आहे की नाही हे दाखवण्यासाठी एक महिलेला जवळ ओढूले आणि तिच्या ओठांचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.हा व्हिडीओ सध्या सोशल मिडिावर प्रचंड व्हायरल झालेला आहे.
आपण पोलिसांच्या सिंघम स्टाईलचे व्हिडीओ, डान्सचे व्हिडीओ किंवा एखाद्याला जीवनदान देतानाचे अनेक व्हिडीओ एवढच नाही तर भर ऊन्हात, पावसात, आंदोलनात, आपले घर-कुटुंब सोडून जनतेच्या रक्षणासाठी रस्त्यांवर दिवस-रात्र उभे राहिलेले व्हिडीओसुद्धा आपण पाहिले आहे. तेव्हा खरोखरच आपल्या मनातील त्यांचा आदर हा वाढतो. मात्र पोलिसांनीच कायदा सुवस्था मोडणारा किंवा चुकूची भूमिका असेलला एखादा व्हिडीओ समोर आला तर नक्कीच वाईटही वाटतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. या व्हिडीओमधील महिला पोलीस अधिकाऱ्याची कृती पाहून कोणाचाही राग अवनावर होईल.
महिलेला जवळ ओढून चुंबन घेण्याचा प्रयत्न
पश्चिम बंगालमधील सिलीगुरी येथे एका महिला पोलीस अधिकाऱ्याने मद्यप्राशन केले आहे की नाही हे दाखवण्यासाठी एक महिलेला जवळ ओढूले आणि तिच्या ओठांचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव तानिया रॉय असे असून त्या सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) पदावर आहेत. दरम्यान पेट्रोलिंग ड्युटीदरम्यान मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही दिसून आले.
ही महिला पोलीस अधिकारी इतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह महिलांच्या सुरक्षिततेसाठी परिसरात पिंक पोलिस मोबाइल व्हॅनमधून पेट्रोलिंग करत होत्या. बुधवारी रात्री पेट्रोलिंगदरम्यान या पिंक व्हॅनने एका व्यक्तीला धडक दिली, त्यानंतर अनेक स्थानिक महिला घटनास्थळी जमा झाल्या. त्यांनी तानिया यांच्यासोबत वाद घालण्यास सुरूवात केली.
दारूच्या नशेत गाडी चालवल्याचा स्थानिकांचा आरोप
पोलीस अधिकारी तानिया रॉय दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याचा आरोप घटनास्थळी उपस्थिती असलेल्या महिलांनी केला आहे. तेथील महिलांनी आक्षेप घेत तानिया यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी तानिया यांनी मद्यप्राशन केले आहे की नाही हे दाखवण्यासाठी एक महिलेला जवळ ओढून त्या महिलेची मान धरली अन् तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. हे लाजिरवाणे कृत्य पाहून तेथील सर्वच स्त्रिया संतापल्या.
Only in Bengal a drunk policeman tries to kiss women in the streets & walks away freely.
Good going @KolkataPolicepic.twitter.com/7NVkyXyUTb
— Squint Neon (@TheSquind) October 25, 2024
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी गोंधळ घातला. तेथील परिस्थिती पाहाता पोलीस अधिकाऱ्याने तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र गावकरी आक्रमक होऊन त्या महिला पोलीस अधिकाऱ्याला रोखण्याचा प्रयत्न करत होते. या घटनेमुळे आता आता कोलकाता पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
पोलिसांवरील विश्वासावर प्रश्नचिन्ह
मीडिया रिपोर्टनुसार या पोलीस अधिकारी महिलांच्या सुरक्षिततेसाठीच परिसरात पेट्रोलिंग करत होत्या आणि त्याच पोलीस अधिकाऱ्याने महिलांसोबत असे कृत्य करणे म्हणजे पोलिसांवर विश्वास ठेवावा का असा प्रश्न निर्माण होतो, आणि तेही महिला पोलीस अधिकारीच असे करत असतील तर, स्त्रियांना महिला पोलिसांवरही विश्वास ठेवणे असुरक्षित वाटेल. एकंदरीतच पोलिसांच्या कार्यशैलीवरसोबतच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न नक्कीच ऐरणीवर आला आहे असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही.
सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान एक्सवर @TheSquind नावाच्या अकाउंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. लोकांनी या व्हिडीओवर तीव्र संताप व्यक्त केला आहे तसेच या महिला पोलीस अधिकाऱ्यावर कडक कारवाईची मागणीही केली आहे. व्हिडीओ पाहून जे घडलं ती अतिशय लाजिरवाणी बाब असल्याचेही मत नेटकऱ्यांनी मांडले आहे. दरम्यान पोलिस विभागाकडून यावर अद्याप तरी कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही, मात्र हा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तपासाची मागणी केली जात आहे.
या व्हिडीओवरून एकच मुद्दा समोर येतो तो म्हणजे जर कोणत्या पुरुष पोलीस अधिकाऱ्याने महिलांसोबत जर कोणती गैरवर्तन केली तर त्यांच्याविरोधात तक्रार केली जाते, कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते. पण आता इथे एका महिला पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या गैरवर्तनाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून यावर कोणती कारवाई होणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.