वर्ल्ड क्यूटेस्ट बेबी, लाखोंनी चाहते असणारी गोड अनाहिता नेमकी आहे तरी कोण ?

अनाहिताचे संपूर्ण इंटरनेटवर लाखोंनी चाहते आहेत. विशेष म्हणजे अनाहिता इंटरनेटरवर वर्ल्ड क्यूटेस्ट बेबी म्हणून ओळखली जाते.

वर्ल्ड क्यूटेस्ट बेबी, लाखोंनी चाहते असणारी गोड अनाहिता नेमकी आहे तरी कोण ?
ANAHITA CUTEST BABY
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 5:40 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच कशाचीतरी चर्चा असते. या मंचावर रोजच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वातावरण तापलेलं असतं. समाजमाध्यमांवर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. यामध्ये काही लहान आणि गोंडस मुलीसुद्धा इंटरनेटवर चर्चेत असतात. मात्र, यापैकी सर्वात क्यूट आणि गोड दिसणाऱ्या अनाहिताची गोष्ट काही वेगळीच आहे. अनाहिताचे इंटरनेटवर लाखोंनी चाहते आहेत. विशेष म्हणजे अनाहिता इंटरनेटरवर वर्ल्ड क्यूटेस्ट बेबी म्हणून ओळखली जाते. (Anahita Hashemzadeh world cutest baby girl photos and details information)

कोण आहे अनाहिता ?

अनहिता ही इंटरेनटर व्हायरल होणारी एक लहान मुलगी आहे. या मुलीच्या सौंदर्याचे लाखोंनी चाहते आहेत. तिचे पूर्ण नाव अनाहिता हशमजादेह असून तिचा जन्म 10 जानेवारी 2016 या दिवशी झाला. म्हणजे ही मुलगी सध्या अवघ्या साडे पाच वर्षांची आहे. अनाहिता मूळची ईरानमधील इस्फहान शहरातील आहे.

अनाहिता 2019 मध्ये चर्चेत आल्यानंतर लडाखचे खासदार जामयांग नामग्याल यांनी 2019 मध्ये तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. सोबतच त्यांनी “मी आज इंटरनेटवर सर्वात सुंदर आणि गोड अशी पाहिलेली ही गोष्ट आहे,” असे कॅप्शन दिले होते. नामग्याल यांच्या याच पोस्टनंतर अनाहिता भारतात चर्चेचा विषय ठरली होती. सध्या तिचे वेगवेगळ्या देशात चाहते आहेत.

अनाहिता आहे वर्ल्ड क्यूटेस्ट बेबी

नामग्याल यांनी अनाहिताचा हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर आकाऊंटवर पोस्ट केला होता; तेव्हा ती जगभरात व्हायरल झालेली होती. अनाहिता 2019 मध्ये इंटरनेटवर जेव्हा व्हायरल झाली, तेव्हा तिचे वय अवघे तीन वर्षे होते. अनाहिताच्या गोड हसण्यामुळे तिची स्माईल ही जगातील सर्वात गोड स्माईल असल्याचे म्हटले जाते. तुम्ही इंटरनेटवर ‘World Cutest Baby’ असं सर्च केलं तर तुम्हाला अनाहिताचे फोटो आणि तिचेच नाव दिसेल. सध्या अनाहिता एक बेबी मॉडेल आहे. अनाहिता हशमजादेह सध्या छोटी असल्यामुळे तिची आईच तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट सांभाळते.

इतर बातम्या :

Video | लहान मुलांची चिखलात धम्माल, व्हिडीओ पाहून आयपीएस ऑफिसरला आठवलं बालपण

Video | नदीच्या किनाऱ्यावर लोक थांबले, मध्येच जमीन खचली, पुढे काय झालं एकदा बघाच !

Video | चार माणसांसोबत महिलेची ऑनलाईन बैठक, मध्येच झाला मोठ्ठा घोळ, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

(Anahita Hashemzadeh world cutest baby girl photos and details information)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.