आनंद महिंद्रा यांनी एका चौकाचा व्हिडीओ शेअर करताच, लोक उठले पेटून !
2004 ते 2006 दरम्यान 237 मोठे अपघात झाले. हा व्हिडीओ बघताना लोकांनी भारतात काय-काय होतं याची देखील आठवण करून दिलीये. आनंद महिंद्रा यांच्या पोस्टवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, सिग्नल नसलेल्या चौकात धोका सर्वात जास्त असतो. भारतातील अनेक भागांत रस्त्यांवर ट्रॅफिक सिग्नल असूनही ते खराब आहेत, असेही लोकांचे म्हणणे आहे.
मुंबई: भारतातील बहुतांश चौकांमध्ये अनेक दिशांनी येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. त्या चौकात लाल सिग्नल नसेल तर जाम होणारच. भारतात अनेकदा सिग्नल नसलेल्या चौकांमध्ये लोक तासनतास उभे राहतात. अनियमित रहदारीमुळे होणारे धोके आणि गैरसोयींकडे बरेचदा दुर्लक्ष केले जाते, परंतु ते अत्यंत धोकादायक ठरू शकते. वाहन उद्योगातील दिग्गज आनंद महिंद्रा यांनी गुरुवारी इथिओपियातील मेस्केल स्क्वेअरमधील एक क्लिप शेअर केली आणि भारतीय रस्त्यांशी तुलना केली.
ट्रॅफिक सिग्नल असूनही ते खराब
ॲम्युझिंग प्लॅनेटच्या मते, मेस्केल स्क्वेअर इथिओपियामध्ये एक मोठा अपघात हॉटस्पॉट मानला जातो आणि 2004 ते 2006 दरम्यान 237 मोठे अपघात झाले. हा व्हिडीओ बघताना लोकांनी भारतात काय-काय होतं याची देखील आठवण करून दिलीये. आनंद महिंद्रा यांच्या पोस्टवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, सिग्नल नसलेल्या चौकात धोका सर्वात जास्त असतो. भारतातील अनेक भागांत रस्त्यांवर ट्रॅफिक सिग्नल असूनही ते खराब आहेत, असेही लोकांचे म्हणणे आहे.
Busiest intersection in Ethiopia without traffic lights. No no no. I refuse to let india relinquish the world title for organised chaos! 😊 pic.twitter.com/JMA9j7NuP9
— anand mahindra (@anandmahindra) August 10, 2023
सरकारने कठोर पावले उचलावीत
एका युजरने लिहिलं, ‘भारतात एकच गोष्ट म्हणजे इथल्या रस्त्यांवर सिग्नलचे खांब काम करत नाहीत. तुम्ही अहमदाबाद किंवा पुण्याला गेला नाही का? आणखी एका व्यक्तीने लिहिले की, ‘पुण्यात असे अनेक रस्ते आहेत. शहरात 90 टक्के वाहने चालविली जात असल्याने वाहतुकीला चांगली शिस्त, सिग्नल्सचे योग्य कामकाज, शहरातील रस्त्यांची चांगली देखभाल याबाबत सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी वाहन उत्पादकांनी करण्याची वेळ आली आहे.’