Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video: जुगाडू संशोधन! आनंद महिंद्रांनी ट्विट करत केलं कौतुक, तुम्हीही बनवा घरबसल्या टाकाऊ पासून टिकाऊ

व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती लांब काठीचा वापर करताना दिसत आहे, ज्याच्या शेवटी प्लास्टिकची बाटली आहे. तो त्या बाटलीच्या साहाय्याने झाडावरून फळं तोडण्याचा प्रयत्न करतोय. या वृद्ध व्यक्तीने मस्त जुगाड लावलाय, ही बाटली मागील बाजूस चार भागात उघडते आणि नंतर फळ पकडल्यानंतर बंद होते.

Viral Video: जुगाडू संशोधन! आनंद महिंद्रांनी ट्विट करत केलं कौतुक, तुम्हीही बनवा घरबसल्या टाकाऊ पासून टिकाऊ
फळं तोडण्याचं उपकरणImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 2:20 PM

अनेकदा आपण रद्दीत पडलेल्या मालाला तितकंसं महत्त्व देत नाही, पण जेव्हा त्याचा उपयोग होतोय हे कळतं तेव्हा तो पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. जे लोक हस्तकलेत रस घेतात, क्रिएटिव्ह (Creative) असतात त्यांच्याकडे जंकमध्ये पडलेल्या वस्तूंना कामाची गोष्ट बनविण्याचे कौशल्य असते. देसी जुगाडच्या मदतीने एका माणसाने एका झाडाची फळे तोडण्यासाठी कॅचर (Fruit Catcher) बनवले, ज्यामुळे लोकांना चांगलंच आश्चर्य वाटलं. उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनीही हा व्हिडिओ शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे.

फळं तोडण्याचं उपकरण

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी झाडांपासून फळे तोडण्यासाठी एका साध्या घरगुती उपायाचा (एक जुगाड) व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ इंटरनेट युजर्सनी 4,00,000 हून अधिक वेळा पाहिलाय. आनंद महिंद्रा हा व्हिडीओ बघून अत्यंत प्रभावित झाले. व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती लांब काठीचा वापर करताना दिसत आहे, ज्याच्या शेवटी प्लास्टिकची बाटली आहे. तो त्या बाटलीच्या साहाय्याने झाडावरून फळं तोडण्याचा प्रयत्न करतोय. या वृद्ध व्यक्तीने मस्त जुगाड लावलाय, ही बाटली मागील बाजूस चार भागात उघडते आणि नंतर फळ पकडल्यानंतर बंद होते.

हे सुद्धा वाचा

जुगाडचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

या व्हिडीओमध्ये हे उपकरण माणसाने कसं बनवलं, हेही पाहायला मिळतंय. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ ट्विट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हा फार मोठा शोध नाही, परंतु मी उत्साही आहे कारण हा छोटासा शोध आपल्या संस्कृतीचे प्रतिबिंबित करतो. बेसमेंट-गॅरेज वर्कशॉप्समध्ये प्रयोग करण्याच्या सवयीमुळे अमेरिका हे आविष्काराचे पॉवरहाऊस बनले. असे छोटे संशोधकही संशोधनाचे टायटन्स बनू शकतात.” सोशल मीडियावर या व्हिडिओला लाईक केले जात आहे.

टाकाऊ पासून टिकाऊ

हा व्हिडीओ खरं तर फार उपयोगाचा व्हिडीओ आहे. टाकाऊ पासून टिकाऊ हे आपण फक्त ऐकलंय. हे उपकरण बनवायला फक्त एक साधी प्लॅस्टिकची बाटली, एक नायलॉनची दोरी लागते. या उपकरणाने हा माणूस झाडावरचे पेरू सहज तोडतोय. कितीही उंचीवर फळ असलं तरी सहजच या उपकरणाने फळं तोडता येऊ शकतात.

ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं...
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं....