Anand Mahindra: टप्प्या टप्प्याने डॉक्टरांचं हस्ताक्षर कसं बदललं? आनंद महिंद्रांनी सांगितलं एक व्हिडिओत
डॉक्टरांचं अक्षर तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांचं अक्षर हा सोशल मीडियावर विनोदाचा भाग आहे. ते अक्षर फक्त मेडिकल वाल्यांना कळतंय हेही तितकंच खरंय.
जेव्हा आपण डॉक्टरकडे (Doctor) जातो तेव्हा आपल्याला गोळ्या औषधं एका प्रिस्क्रिप्शनवर (Prescription) लिहून दिली जातात. ते अक्षर किती लोकांना समजतं हा नेहमीच एक फार महत्त्वाचा मुद्दा असतो. आपण ते घेतो आणि मेडिकलमध्ये जातो आपल्याला विश्वास असतो हे अक्षर मेडिकलवाल्याला नक्कीच कळणार. तसंच होतं, ते अक्षर मेडिकलवाल्यालाच कळतं. यापूर्वी या गोष्टीवर अनेक विनोद आले, व्हायरल झाले. असाच एक विनोद शेअर केलाय आनंद महिंद्रांनी. आनंद महिंद्रा हे आपल्या व्यवसायाबरोबरच विनोदबुद्धीसाठीही ओळखले जातात. आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे जो प्रचंड व्हायरल (Viral Video) झालाय. डॉक्टरांचं अक्षर तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांचं अक्षर हा सोशल मीडियावर विनोदाचा भाग आहे. ते अक्षर फक्त मेडिकल वाल्यांना कळतंय हेही तितकंच खरंय. डॉक्टरांच्या अक्षरावरून असाच व्हिडीओ शेअर केलाय आनंद महिंद्रांनी. हा व्हिडीओ ज्याला कुणाला सुचलाय त्याला तुम्ही सलाम कराल.
आनंद महिंद्रा यांचं व्हायरल ट्विट
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हस्ताक्षराचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतायत. हा व्हिडिओ पोस्ट करत महिंद्रानी लिहिलंय, ” हे खरं आहे”.
बघुयात आनंद महिंद्रांनी काय शेअर केलंय म्हणजे तुम्हाला कळेल हा व्हिडीओ इतका शेअर व्हायचं कारण काय.
व्हिडीओ
Hilarious. But true… pic.twitter.com/b3uoFIIm1R
— anand mahindra (@anandmahindra) September 4, 2022
या व्हिडीओमध्ये हस्ताक्षराचा टप्पा दाखविण्यात आलाय. दहावीपासूनचा हा टप्पा स्पेशालिस्ट डॉक्टरपर्यंत येऊन थांबतो. ह्यात विद्यार्थ्यांचं हस्ताक्षर कसं टप्प्याटप्प्यानं बिघडत जातं ते एकदम विनोदी पद्धतीनं दाखविण्यात आलंय.
शेवटी तर स्पेशाशालिस्ट डॉक्टर झाल्यावर अक्षर एकदम सरळ रेषेतच येतं. हे तेच हस्ताक्षर आहे का जे आपल्याला डॉक्टर लिहून देतात?
लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला
ही पोस्ट ट्विटरवर खूप व्हायरल होत आहे. या पोस्टला आतापर्यंत हजारो लोकांनी (सोशल मीडिया युजर्स) लाईक आणि रिट्विट केले आहे.
कमेंट सेक्शनमध्ये अनेक युजर्स आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसले. अनेकांना व्हिडिओमध्ये दाखवलेली गोष्ट बऱ्याच अंशी खरी सुद्धा वाटते.