चंद्रावर THAR चं लँडिग! आनंद महिंद्रा सुद्धा खुश, म्हणाले “थँक्यू ISRO”
चांद्रयान 3 च्या यशाचं कौतुक सगळेच करतायत. आनंद महिंद्रा सुद्धा मागे राहिलेले नाहीत. आनंद महिंद्रा यांनी महिंद्रा कंपनीची गाडी सुद्धा अशीच एकदिवस चंद्रावर लँड करेल असा विश्वास व्यक्त केलाय. असा मेसेज देणारा एक व्हिडीओ सुद्धा त्यांनी पोस्ट केलाय. लोकं याला भरभरून प्रतिसाद देतायत.
मुंबई: आनंद महिंद्रा हे आपल्या सोशल मीडियावर खूप प्रचंड ॲक्टिव्ह असतात. ते नेहमीच काही ना काही पोस्ट करत असतात. ट्विटरवर त्यांचे अनेक फॉलोवर्स आहेत. हे फॉलोवर्स त्यांच्या सगळ्या पोस्टवर कमेंट्स, लाईक्स करत असतात. आताही उद्योगपती आनंद महिंद्रा यांचं एक ट्विट असंच व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये महिंद्रा कंपनीची एसयूवी Thar-E डायरेक्ट चंद्रावर उतरलीये. होय. तुम्हालाही प्रश्न पडेल असं कसं? पण आनंद महिंद्रा यांनी स्वतः हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केलाय. हा व्हिडीओ खूप व्हायरल झालाय, लोकं सुद्धा यावर भरभरून कमेंट्स करतायत.
ISRO चे अभिनंदन
हा व्हिडीओ बघा. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेला या व्हिडीओमध्ये. चंद्रावर चांद्रयान जाऊन थांबलंय, जरा वेळाने त्यातून महिंद्रा कंपनीची एसयूवी Thar-E बाहेर पडते. आनंद महिंद्रा यांनी चांद्रयान 3 साठी ISRO चे अभिनंदन केलंय आणि एकदिवस महिंद्रा कंपनीची एसयूवी Thar-E सुद्धा अशीच चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल असा विश्वास व्यक्त केलाय. हा व्हिडीओ ॲनिमेटेड आहे जो महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या अधिकाऱ्याने बनवलाय.
Thank you @isro for giving our ambitions a ‘lift-off.’ One day, in the not too distant future, we will shoot for the Thar-e touching down next to Vikram & Pragyan and ‘Exploring the Impossible!’ (🙏🏽 @BosePratap for putting together this meme) pic.twitter.com/SRtbDUiiQh
— anand mahindra (@anandmahindra) September 3, 2023
व्हिडिओला 7 लाख लोकांनी पाहिला
शक्कल लढवून या अधिकाऱ्याने हा व्हिडीओ बनवलाय आणि लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केलाय की तो दिवस दूर नाही ज्या दिवशी महिंद्राची Thar चंद्रावर लँड करेल. हा व्हिडीओ ॲनिमेटेड आहे. ही क्लिप दहा सेकंदाची आहे आणि या व्हिडिओला 7 लाख लोकांनी पाहिलंय. लोकांनी यावर महिंद्रा कंपनीचं, Thar चं आणि आनंद महिंद्रा यांचं भरभरून कौतुक केलंय. लोक म्हणतात, इस्रो आणि महिंद्रा कंपनी काहीही करू शकते. काहीजण म्हणतायत, चंद्रावर खडबडीत पृष्ठभागावर महिंद्राची Thar सुसाट सुटेल!