Video | फूड डिलिव्हरी करणाऱ्या ड्रोनवर कावळ्याचा हल्ला, हवेतील युद्ध कॅमेऱ्यात कैद

पक्ष्याने हवेत उडणाऱ्या ड्रोनला आपल्या चोचीने पळवून लावले आहे. पक्ष्याची ही करामत सध्या चर्चेचा विषय ठरली असून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Video | फूड डिलिव्हरी करणाऱ्या ड्रोनवर कावळ्याचा हल्ला, हवेतील युद्ध कॅमेऱ्यात कैद
VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 7:32 PM

मुंबई : विकास, प्रगतीच्या नावाखाली आपण नैसर्गिक साधनसंपत्तीची मोठी हानी केली आहे. मानवाच्या हव्यासापोटी तापमानवाढ, वातावरणातील बदल अशा भीषण संकटांना आपण तोंड दोत आहेत. विकास साधण्यासाठी घोडदौड करताना आपण प्राणी तसेच पक्ष्यांचे जीवन धोक्यात टाकले आहे. अनेक पक्षी आता नाहीसे होत आहेत. मात्र, सध्या एका पक्ष्याने याच प्रगती आणि तंत्रज्ञनाला चांगलाच विरोध केला आहे. पक्ष्याने हवेत उडणाऱ्या ड्रोनला आपल्या चोचीने पळवून लावले आहे. पक्ष्याची ही करामत सध्या चर्चेचा विषय ठरली असून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (angry birds attack on food delivery drone in air video went viral on social media)

कावळ्याचा ड्रोनवर थेट हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा ऑस्ट्रेलिया देशातील आहे. येथे ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणारी एक कंपनी आहे. ही कंपनी तेथील लोकांना कॉफी, जेवण, औषध तसेच इतर गोष्टी घरपोच पुरवते. त्यासाठी या कंपनीकडून ड्रोनचा उपयोग केला जातो. यावेळी एका ड्रोनच्या माध्यमातून कंपनी एका ग्राहकाला पेय पुरवत होती. मात्र मध्येच मोठा घोळ झाला. पेय पोहोचत असलेल्या ड्रोनवर पक्ष्याने थेट हल्ला केला आहे. ड्रोनवर हल्ला करणारा पक्षी कावळा आहे.

व्हिडीओमध्ये नेमके काय आहे ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक ड्रोन हवेत उडत असल्याचे दिसत आहे. ड्रोनला लटकलेले पेय असून ते ग्राहकाकडे पोहोचवण्यात येत आहे. काही क्षणात हे ड्रोन ग्राहकाजवळ जाणार होते. मात्र, त्याआधी कावळ्याने ड्रोनवर हल्ला केलाय. कावळा आपल्या चोचीने ड्रोनला खाली पाडण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच ड्रोनला तो पुढेदेखील जाऊ देत नाहीय.

पाहा व्हिडीओ :

कावळ्याच्या तावडीतून सुटून ड्रोनने पळ काढला

दरम्यान, कावळ्याच्या हल्ल्यानंतर ड्रोनने डिलिव्हरीसाठी आणलेले पेय खाली टाकून दिले आहे. तसेच कावळ्याच्या तावडीतून सुटून तिथून पळ काढला आहे. हा सर्व प्रकार ग्राहकाने कॅमेऱ्याते कैद केला असून हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच त्याला मोठ्या प्रमाणात शेअरही केले जात आहे. सध्या हा व्हिडीओ यूट्यूबवर पाहता येईल.

इतर बातम्या :

Video | भरधाव वेगात रेल्वे रुळ पार करण्याचा प्रयत्न, फाटकाला आदळून मोठा अपघात, व्हिडीओ व्हायरल

सुई पाहून लस घेण्यास नकार, पण मित्रांनी शक्कल लढवली, नेमकं काय केलं ? व्हिडीओ पाहाच

Viral Video: टब शिंगावर घेऊन म्हशीची कलाकारी, लोक म्हणाले, ‘हिच्यापुढे फूटबॉल प्लेअरही फेल’

(angry birds attack on food delivery drone in air video went viral on social media)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.