Video | कामावर असताना डोकं फिरलं, पठ्ठ्याने जेसीबीच्या मदतीने ट्रकचा केला चुराडा, व्हिडीओ व्हायरल

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अचंबित करणारा आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस जेसीबीमध्ये बसला आहे. जेसीबीमध्ये बसून हा माणूस रांगेत उभ्या केलेल्या ट्रकांची तोडफोड करत आहे.

Video | कामावर असताना डोकं फिरलं, पठ्ठ्याने जेसीबीच्या मदतीने ट्रकचा केला चुराडा, व्हिडीओ व्हायरल
viral video
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 1:22 AM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनके व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ तर अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण आश्चर्यचकित होऊन जातो. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्ही हैराण झाल्याशिवाय राहणार नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये जेसीबीच्या माध्यमातून ट्रकची नासधूस करण्यात आली आहे. (angry man crushing trucks by jcb video went viral on social media)

जेसीबीच्या मदतीने ट्रकांची तोडफोड

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अचंबित करणारा आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस जेसीबीमध्ये बसला आहे. जेसीबीमध्ये बसून हा माणूस रांगेत उभ्या केलेल्या ट्रकांची तोडफोड करत आहे. हे ट्रक चांगल्या स्थितीत असल्याचे सुरुवातीला दिसत आहे. पण कामाचे पैसे थकवल्यामळे तसेच भरपूर विनंती करुनही पैसे न भेटल्यामुळे जेसीबीतील माणसाने या ट्रकांची नासधूस करण्याचा टोकाचा निर्णय घेतला.

मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान

हा माणूस रागात आला आहे. रागाच्या भरात माणसाने जेसीबी सुरु केली आहे. तसेच जेसीबी सुरु करुन त्याने एका क्षणात तब्बल तीन ते चार ट्रकांचा चुराडा केला आहे. बघता बघता या माणसाने लाखो रुपयांचे नुकासान केले आहे. या माणसाचा कारनामा पाहून सगळेच स्तब्ध झाले आहेत. ट्रकांची नासधूस होत असताना बाकीचे लोक जेसीबीकडे धावले आहेत. तसेच जेसीबीकडे धावून लोकांनी माथेफिरू माणसाला बाहेर काढले आहे.

पाहा व्हिडीओ :

नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स 

दरम्यान, सध्या ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ ट्विटरवर अपलोड केला आहे, त्याने कॅप्शनमध्ये एक माहिती दिली आहे. बॉसने पगार न दिल्यामुळे माणसाने असे कृत्य दिले आहे, असे कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकरी या व्हिडीओला उत्स्फूर्तपणे शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

Video | पतीशी अनैतिक संबध असल्याचा संशय, महिलेची ऑफिसमध्ये जाऊन बहिणीला मारहाण

‘तमंचे पे व्हिडीओ करणं’ महिला पोलिसाला भोवलं, राजीनामा दिल्यानंतर पोलिसांकडून 1 लाख 82 हजाराच्या भरपाईची नोटीस

Video | दुबळ्या बदकाच्या मदतीला धावले कुत्र्याचे पिल्लू, व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले

(angry man crushing trucks by jcb video went viral on social media)

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.