Video: मांजर आणि अस्वलाची लढाई, तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल? थरारक व्हिडीओ पाहा!

अस्वल आणि मांजराचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला खूप भारी वाटेल. व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून काही लोक आश्चर्यचकित देखील झाले आहेत कारण...

Video: मांजर आणि अस्वलाची लढाई, तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल? थरारक व्हिडीओ पाहा!
मांजर आणि अस्वलाची लढाई
Follow us
| Updated on: Nov 06, 2021 | 1:15 PM

सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे मजेदार व्हिडिओ चांगलेच व्हायरल होतात. त्यातीलच असे काही व्हिडिओ आहेत ज्यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण होतं. सध्या अस्वल आणि मांजराचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला खूप भारी वाटेल. व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून काही लोक आश्चर्यचकित देखील झाले आहेत कारण, एका मांजरीने अस्वलाला ज्या प्रकारे ‘पाणी पाजलं’ ते पाहून सर्वजण थक्क झाले. (Animal attack Bear Cat Fight bear ran away after being afraid of a small cat watch viral video funny video)

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की लहान प्राणी मोठ्या प्राण्यांना घाबरून पळून जातात. त्याचवेळी थेट हल्ला करणारेही प्राणीही पाहायला मिळतात. पण अस्वलाला मांजरीची भीती वाटते हे तुम्ही क्वचितच पाहिले असेल. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मांजर शेतात मस्ती करत आहे. तेवढ्यात अचानक एक अस्वल तिथे येते आणि मांजराला घाबरवण्याचा प्रयत्न करते. पण, मांजर पलटवार करते आणि अस्वलाची पळता भूई थोडी होते. व्हिडीओत मांजर अस्वलाच्या मागे लागते, आणि अस्वल जोरात पळताना दिसत आहे.

व्हिडीओ पाहा:

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, त्यासोबतच लोक त्यांच्या प्रतिक्रियाही शेअर करत आहेत. लोकांना हा व्हिडिओ इतका आवडला आहे की ते अधिकाधिक प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. IFS सुसंता नंदा यांनी त्यांच्या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आतापर्यंत 29 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर 23शेहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलताना एका यूजरने कमेंट करताना लिहिले, ‘स्वत:च्या गल्लीत मांजरही सिंह असते’ दुसर्‍या यूजरने लिहिले की, ‘मांजरीच्या धाडसाचं कौतुकच करावं लागेल’ याशिवाय बहुतेक लोकांनी इमोजी शेअर करून त्यांची प्रतिक्रिया शेअर केली आहे.

हेही पाहा:

सानिया मिर्झाने पतीला हात दिला, शोएबने त्यानंतर काय केलं पाहा, सानिया-शोएबचा मजेदार व्हिडीओ!

Viral: फटाके स्कुटरवरुन नेत असताना जबरदस्त स्फोट, पिता-पुत्राचा मृत्यू, हादरवून सोडणारा व्हिडीओ

 

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.