सोशल मीडियावर असे काही व्हिडिओ आहेत जे एकदा पाहिल्यानंतर मन भरत नाही आणि पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटते. अलीकडच्या काळात असाच एक सुंदर व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे, जो पाहून तुमचा दिवस आनंदात जाईल.अनेकदा मुलं पाणी दिसलं की, त्याच्याशी खेळायला लागतात, फक्त माणसांची मुलंच असं करतात असं नाही. तर प्राणीही हेच करतात. असाच काहीसा प्रकार आजकाल समोर आला आहे. ज्यामध्ये छोट्या हत्तीची कृती तुम्हाला खूप गोंडस वाटेल. व्हिडिओमध्ये छोटा गजराज पाण्याचा मनसोक्त आनंद घेत आहे. ( animal video Baby elephant enjoy their Water bath in lake after seeing this video people Say they remember shinchan)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हत्तीचे पिल्लू तलावाच्या पाण्यात आंघोळ करताना दिसत आहे. या पिल्लाचा आनंद पाहून असं वाटतंय की, जणू काही सुट्टीत तो फिरायला इथं आला आहे, पाण्यात हातपाय पसरून आनंद लुटतोय. हत्तींचे कळप सुद्धा आजूबाजूला उभे राहून आंघोळ करत आहेत, जे पिलाला मदत करत आहेत. हत्तीचे पिल्लू आपली सोंड हलवून मजा घेत होते.
व्हिडीओ पाहा
If you want to define cuteness.. pic.twitter.com/mN1BIGQNs9
— Susanta Nanda IFS (@susantananda3) October 31, 2021
25 सेकंदाचा हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यासोबत त्याने कॅप्शन लिहिले की, ‘तुम्ही ‘क्यूटनेस’ची व्याख्या केली तर? व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर यूजर्स आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.
सोशल मीडियावर या व्हिडिओला लोक मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत. यामुळेच अनेक युजर्सनी व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया नोंदवली. एका यूजरने म्हटले की, ‘या हत्तीची हालचाल हुबेहूब शिंच्यानसारखी आहे.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, हे दृश्यं खरोखरच गोंडस आहे, हे पाहिल्यानंतर मला माझे बालपण आठवले. याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी लिहिले. या व्हिडिओचे कौतुक केले.
हेही पाहा: