Video: अस्वल लाडात आलं, मालकामागे गाडी शिरण्याचा प्रयत्न केला, आणि त्यानंतर जे झालं, त्याचा चांगलाच भुर्दंड!

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एका पार्कमध्ये केशरी रंगाची स्पोर्ट्स कार उभी आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती बसली आहे आणि दुसऱ्या बाजूला एक अस्वल उभे आहे, जे खिडकीतून कारमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे.

Video: अस्वल लाडात आलं, मालकामागे गाडी शिरण्याचा प्रयत्न केला, आणि त्यानंतर जे झालं, त्याचा चांगलाच भुर्दंड!
कारमध्ये शिरण्याचा प्रयत्न करणारं अस्वल
Follow us
| Updated on: Dec 01, 2021 | 9:30 AM

प्राण्यांशी मैत्री ही खूप चांगली गोष्ट आहे. प्राण्यांनाही माणसांसारखीच वागणूक दिली पाहिजे, कारण या निसर्गात कुणीही कुणापेक्षा कमी नाही. तसे, जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना ‘अ‍ॅनिमल लव्हर्स’ म्हटले जाते आणि त्यांच्याकडे कुत्रा, मांजरीसह अनेक प्रकारचे पाळीव प्राणी आहेत, जे त्यांना खूप आवडतात. काही लोक अस्वल, सिंह, वाघ यांसारखे धोकादायक प्राणीही पाळतात. सध्या सोशल मीडियावर पाळीव अस्वलाचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच हसू येईल. खरं तर, कारमध्ये प्रवेश करण्याच्या प्रक्रियेत, अस्वलाने इतकी भयानक चूक केली की कार मालकाला त्याची चांगलीच किंमत मोजावी लागली. अस्वलाने त्या गाडीतील व्यक्तीचे खूप नुकसान केले. ( Animal Video of Bear was trying to enter the car but accidently he uprooted the door Viral Video)

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एका पार्कमध्ये केशरी रंगाची स्पोर्ट्स कार उभी आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती बसली आहे आणि दुसऱ्या बाजूला एक अस्वल उभे आहे, जे खिडकीतून कारमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. पण गाडीची खिडकी लहान आणि त्या अस्वलाचा आकार खूप मोठा असल्याने त्याला आत जाता येत नाही. मग अस्वलाला कळतंच नाही की काय करावे, त्यातच त्याने गाडीचे दार थोडे जोराने आपल्या दिशेने ओढले. मग काय, कारचा दरवाजा उखडून गाडीपासून वेगळा झाला. यानंतर अस्वलही घाबरले आणि पळून गेले.

व्हिडीओ पाहा:

मात्र, दरवाजा वेगळा केल्यानंतर अस्वलाला वाटले की, आता आपण आरामात गाडीत प्रवेश करू शकतो, तेव्हा ते पुन्हा कारच्या दिशेने निघाले. दर्शकांच्या दृष्टिकोनातून हा व्हिडीओ खूपच मजेशीर असला तरी, कार चालकाला याचा चांगलाच फटका बसला आहे. आता या बिचाऱ्या व्यक्तीला विनाकारण सर्व्हिसिंग सेंटरमध्ये जाऊन गाडीचा दरवाजा बसवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.

हा मजेशीर व्हिडिओ इंस्टाग्रामवर ब्यूटिफुलग्राम नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यावर आतापर्यंत 1 लाख 50 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 5 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे.

हेही पाहा:

Video: देव करो आणि हा व्हिडीओ खोटा ठरो, बर्थ डे बंम्पज देताना ‘तो’ गुदरमला, हादरवणारा व्हिडीओ

Viral: लहान मुलांचा हा व्हिडीओ तुम्हाला भावनिक केल्याशिवाय राहणार नाही, पाहा व्हिडीओ

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.