Video: ‘माकडाला कळतं, कसं खायचं, तुला नाही!’, माकडाचा व्हिडीओ पाहून मित्रांना टॅग करणं सुरु!

व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये खुर्चीवर बसलेले एक छोटं माकड मोठ्या उत्साहाने जेवण करत असल्याचे तुम्ही पाहू शकता. हे माकड एका भांड्यात ठेवलेली खीर चमच्याने खात आहे

Video: 'माकडाला कळतं, कसं खायचं, तुला नाही!', माकडाचा व्हिडीओ पाहून मित्रांना टॅग करणं सुरु!
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 3:55 PM

प्राण्यांचे अनेक गोंडस व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ खूप मजेदार असतात, जे पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. तर काही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटतं आणि तुम्ही विचारात पडता. विशेषतः सोशल मीडिया यूजर्सना माकडांशी संबंधित व्हिडिओ पाहायला आवडतात. खरंतर माकडांच्या पिलांमधला गोंडसपणा एवढा असतो की, ते व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघायला आवडतात. सध्या एका माकडाचा असाच एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे. (Animal Video Shows Monkey eating Food with spoon like human Video goes Viral)

व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये खुर्चीवर बसलेले एक छोटं माकड मोठ्या उत्साहाने जेवण करत असल्याचे तुम्ही पाहू शकता. हे माकड एका भांड्यात ठेवलेली खीर चमच्याने खात आहे, जणू एखादा माणूसच ती खात आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल की हे माकड चमच्याचा इतक्या सहजतेने कसं वापर करु शकतं. कारण या माणसांच्या मुलांना चमचा कसा धरायचा हेही समजत नाही त्या वयात माकड चमच्याने भराभर खात आहे.

व्हिडीओ पाहा:

View this post on Instagram

A post shared by @monkey.lovable

माकडाचा हा अतिशय गोंडस व्हिडिओ इंस्टाग्रामवर monkey.lovable या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. 13 नोव्हेंबर रोजी शेअर केलेल्या या व्हिडिओला 1 लाख 80 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. माकडाच्या शिष्टाचाराचे सर्वजण कौतुक करत आहेत. या व्हिडिओवर डझनभर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणी म्हणतो की, हा मुलांपेक्षाही चांगल्याप्रकारे खात आहे, तर काही युजर्सनी त्यांच्या मित्रांना टॅग करत लिहिले आहे की, तुम्ही जेवण कसे करता आणि हे कसं करतंय पाहा. एकूणच हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे.

हेही पाहा:

Pushpa The Rise : फुल्ल चर्चा! एका क्लिकवर ऐका पुष्पा चित्रपटातल्या ‘या’ गाण्याचे व्हर्जन

VIDEO : सावधान…लग्नामध्ये आतिषबाजी करत आहात? मग हा गुजरातमधील नवरदेवाच्या घोडागाडीला आग लागलेला व्हिडीओ नक्की पाहा!

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.