कासवाने केलं प्रयोगशाळेचं उद्घाटन, व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले, उद्घाटनाचा प्रयोगही भन्नाट आहे!
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका कासवाने पाने आणि डहाळ्यांनी बनवलेल्या फिती कुरतडून विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. हा व्हिडीओ 2015 सालचा असला, तरी तो पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.
जर तुम्ही इंटरनेटच्या दुनियेत सक्रिय असाल तर तुम्हाला माहित असेल की दररोज काही ना काही मजेदार व्हिडिओ असतात. यामध्ये अनेक गोष्टी हसण्यासारख्या आहेत, तर काही गोष्टी पाहून आश्चर्य वाटते, पण इथं अनेक अशाही गोष्टी व्हायरलही होतात, ज्या पाहून आपला दिवस आनंदात जातो. तुम्ही आजपर्यंत प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ पाहिले असतील, पण तुम्ही कधी कासवाने एखाद्या वास्तूचं उद्घाटन करताना पाहिले आहे का?, नाही तर हा व्हिडीओ तुमच्यासाठीच आहे. (Animal Video Turtle inaugurated science lab by cutting ribbon made of leaves Viral Video)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका कासवाने पाने आणि डहाळ्यांनी बनवलेल्या फिती कुरतडून विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. हा व्हिडीओ 2015 सालचा असला, तरी तो पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. बीबीसीने दिलेल्या बातमीनुसार, चार्ल्स डार्विन असे या कासवाचे नाव असून त्याला निसर्गवादी आणि टीव्ही अँकर ख्रिस पॅकहॅम यांनी हाताने पकडले आहे, जेणेकरून तो पानांपासून बनवलेल्या फिती कुरतडून विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन करू शकेल.
हा व्हिडीओ पाहा
Tortoise opening the new science lab at the University of Lincoln.. pic.twitter.com/IeM9seX1Db
— Buitengebieden (@buitengebieden_) November 18, 2021
हा मनमोहक व्हिडिओ ट्विटरवर Buitengebieden नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिले की, ‘लिंकन विद्यापीठात एक कासव नवीन विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन करत आहे. या व्हिडिओला बातमी लिहिपर्यंत 12 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय यूजर्स कमेंट्सच्या माध्यमातून स्वतःच्या प्रतिक्रिया देत आहेत.
सोशल मीडियावर लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. यामुळेच अनेक युजर्सनी व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया नोंदवली. व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ‘कासवालाही असंच वाटत असेल की, ओपनिंग ठीक आहे. पण मला पूर्ण जेवण तरी करू द्या! दुसरीकडे, दुसर्या नेटकऱ्याने लिहिले की, मी आतापर्यंत पाहिलेलं हे सर्वोत्तम उद्घाटन आहे, खरंच आश्चर्यकारक!. याशिवाय इतर अनेक यूजर्सनी या व्हिडिओचे वेगवेगळ्या प्रकारे कौतुक केले.
हेही पाहा:
Video: तळकोकणाच्या जैवविविधतेची आणखी एक पाकळी उमलली! वेंगुर्ल्यात अतिदुर्मिळ पोवळा सापाचे दर्शन
Viral Video: बेचकीने एक एक फांदी उडवली, नेटकरी म्हणाले, हा कलियुगातला अर्जून आहे!