Video: 2 हिंस्र प्राण्यांच्या भांडणात काळविटाने आपला जीव वाचवला, व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक!
व्हिडीओमध्ये एका चित्त्याने एका काळवीटाला जमिनीवर पाडलेलं दिसत आहे. तेवढ्यात तिथं एक तरस धावत येतं, आणि चित्त्याला पळवून लावतं. चित्त्याच्या मेहनतीवर ताव मारण्याचा या तरसाचा प्रयत्न या व्हिडीओत दिसतो. तरस काळवीटाचा फडशा पाडणार, तितक्यात...
वन्यप्राण्यांचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओंमध्ये प्राण्यांमधील चित्तथरारक मारामारी पाहायला मिळते, तर काही व्हिडिओंमध्ये छोटे प्राणीही हिंस्र प्राण्यांना धूळ चारताना दिसतात. विशेषत: हरणांच्या बाबतीत हे अनेक वेळा पाहायला मिळतं. सध्या काळवीटचा (हरणांची एक प्रजाती) व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काळवीट एक नव्हे तर दोन भयंकर प्राण्यांना धूळ चारत आपला जीव वाचवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, याला म्हणतात चतुराई. (Animal Viral Video Black Buck plays dead to escape hyena and cheetah funny video)
व्हिडीओमध्ये एका चित्त्याने एका काळवीटाला जमिनीवर पाडलेलं दिसत आहे. तेवढ्यात तिथं एक तरस धावत येतं, आणि चित्त्याला पळवून लावतं. चित्त्याच्या मेहनतीवर ताव मारण्याचा या तरसाचा प्रयत्न या व्हिडीओत दिसतो. तरस काळवीटाचा फडशा पाडणार, तितक्यात पुन्हा चित्ता पुढं येतो. हे पाहून तरस या चित्त्याच्या मागे धावतं, आणि अगदी हीच संधी पाहून काळवीट उठतं, आणि तिथून पळ काढतं. दोघांच्या भांडणात कुणालाही काहीही मिळत नाही. काळवीटाच्या वेगापुढे तरस काहीच नाही, आणि चित्त्याला तर तरसाने पळवून लावल्याने आयता मिळालेला शिकारही त्याला गमवावा लागतो.
पाहा व्हिडिओ:
View this post on Instagram
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर nature27_12 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘चित्ता आणि हायनापासून बचाव करण्यासाठी काळवीटाने मरण्याचे नाटक केले.’ एक दिवसापूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत सुमारे 19 हजार वेळा पाहिला गेला आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे.
काळविटाचा हा अप्रतिम अभिनय पाहून यूजर्सही खूप खुश आहेत. एका युजरवर कमेंट करताना लिहिले की, ‘ज्यावेळी वन्यजीवांमध्ये असा आनंददायी शेवट पाहायला मिळतो, तेव्हा खूप छान वाटतं.’ आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले, ‘काळविटाने अप्रतिम अभिनय केला. या प्राण्यांसोबत प्रत्येक वेळी असे घडावं अशी माझी इच्छा आहे.
हेही पाहा: