Viral video | गीता वाचा किंवा कुराण फक्त आत्मसात करा, ऑटोरिक्षा चालकाचे बोल, पाहा सोशल मीडियावर अनुपम खेर यांचा व्हायरल व्हिडिओ
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. चाहत्यांना देखील त्यांचे व्हिडीओ खूप आवडतात अनुपमन खेर यांनी त्यांच्या सोशल मीडियावरएक व्हिडिओ शेअर केला आहे.
मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. चाहत्यांना देखील त्यांचे व्हिडीओ खूप आवडतात अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडियावरएक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अनुपम खेर एका ऑटोरिक्षा चालकाशी बोलताना दिसत आहेत, जो त्यांना भगवद गीतेचे ज्ञान देत आहे. अनुपम खेर देखील या ऑटोरिक्षा चालकावर चांगलेच प्रभावित होऊन त्याचे कौतुक करत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत . हा व्हिडिओ डिसेंबर महिन्यातील आहे. पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अनुपम खेर यांनी नुकताच इंस्टाग्रामवर भगवद्गीतेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अनुपम खेर ऑटोरिक्षातून प्रवास करत आहेत आणि त्याचवेळी चालकाशी बोलत आहेत. भूपती देव दास असे या ऑटो रिक्षा चालकाचे नाव असून, त्यांनी अनुपम खेर यांना भगवद्गीतेचा पाठ शिकवला आणि त्याच बरोबर अभिनेत्याला चंडी पाठ सांगितला.
येथे पाहा भूपती देव दास यांचा व्हिडीओ
View this post on Instagram
ही व्हिडीओ मीटिंग शेअर करताना अनुपम खेर यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मुंबई मीटिंग्ज: मी माझ्या योग क्लासला जात असताना ऑटोड्रायव्हर भूपती देव दास यांना भेटलो. त्यांच्या संवादातून बरेच काही शिकायला मिळाले. भूपती दास ऑटो रिक्षा देखील चालवतात आणि भगवद्गीतेचे ज्ञान देखील वितरित करतात. या कृष्ण भक्ताचे शब्द तुमच्या हृदयापर्यंत पोहोचतील.’
या व्हिडिओला चाहत्यांनी पसंती दिली आहे, त्यानंतर कॅप्शनच्या शेवटी अनुपम खेर यांनी लिहिले, ‘त्यांना ऐका आणि आमच्या संस्कृतीच्या खोलीचे कौतुक करा. श्रीकृष्ण चिरायु होवो.’ अनुपम खेरचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला असून कमेंट सेक्शनमध्ये ते भूपतीचे कौतुक करत आहेत.
संबंंधित बातम्या :
VIDEO : मनी माऊची भरली शाळा ! शिक्षिका पाहून थक्क व्हाल, पाहा खास व्हायरल व्हिडीओ!
VIDEO : उणे 56 तापमानात हरण गारठले, पुढे लोकांनी काय केले पाहा थक्क करणारा व्हिडीओ!