Arrest Sunny Leone ट्विटरवर ट्रेन्ड, लोक म्हणतात, ‘मधुबन में राधिका नाचे’ गाणे हटवा अन्यथा तुरुंगात जा!
व्हिडीओमधील सनी लियोनीच्या बोल्ड डान्स स्टेप्सवर आक्षेप व्यक्त केलाय. अशावेळी ट्विटरवर Arrest Sunny Leone ट्रेन्ड करत आहे. सनी लियोनी विरोधात ट्विटरवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. सोशल मीडिया यूजर्सकडून हिंदूंच्या भावनांसोबत खेळ खेळला जात असल्याचा आरोप करुन अभिनेत्रीच्या अटकेची मागणी केली आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी (Sunny Leone) सध्या ‘मधुबन मे राधिका नाचे’ (Madhuban Mein Radhika) या गाण्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. नुकत्याच रिलिज झालेल्या या गाण्यावरुन मोठा वाद होताना पाहायला मिळतोय. या व्हिडीओमधील सनी लियोनीच्या बोल्ड डान्स स्टेप्सवर आक्षेप व्यक्त केलाय. अशावेळी ट्विटरवर Arrest Sunny Leone ट्रेन्ड करत आहे. सनी लियोनी विरोधात ट्विटरवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. सोशल मीडिया यूजर्सकडून हिंदूंच्या भावनांसोबत खेळ खेळला जात असल्याचा आरोप करुन अभिनेत्रीच्या अटकेची मागणी केली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर अभिनेत्री सनी लियोनीच्या अटकेची मागणी करण्यासह बिग बॉस रिएलिटी शो होस्ट करणारा अभिनेता सलमान खानवरही राग व्यक्त केला जात आहे. सोशल मीडिया यूजर्स बिग बॉसच्या मंचावरुन या गाण्याचे प्रमोशन केल्याबद्दल सलमान खानवर टीका करत आहेत. अनेकांनी याबाबत सलमान खानवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राधाच्या प्रतिमेवर चिखल उडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
सनी लियोनीने सनातन धर्माचा अपमान केला आहे. या गाण्याद्वारे राधाच्या प्रतिमेवर चिखल उडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. सनी लिनयोनीसह गाण्याशी संबंधित सर्वांना तात्काळ अटक करा, असं एका यूजरने म्हटलं आहे. तर दुसऱ्या यूजरने म्हटलं की, हिंदूंच्या भावनेशी सातत्याने खेळ केला जात आहे. या अश्लील आणि घाणेरड्या आयटम नंबरला सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवरुन हटवलं पाहिजे, अशी मागणी केली आहे. काही ट्वीट्सवर नजर टाकू…
I demand the arrest of Sunny Leone and strict punishment for Selmon for inviting her to promote this song in Bigg Boss.
Arrest Sunny Leone#BoycottBollywood pic.twitter.com/XblKqiDJyJ
— KIZIE #JusticeForSushantSinghRajput (@Sushantify) December 27, 2021
#biocouttSunnyLeone Sunniloni has insulted Sanatan Dharma, has thrown mud on the character of Goddess Radha, so #Arrest_Sunny_Leone and every person who behind the song…..??? pic.twitter.com/tQ8WkBAqXj
— Lipsa ???? ?? (@BastiaLipsa) December 27, 2021
Will they dare to abuse or insult abrahamic faiths, will they dare to make any filthy statements in them
Then why doing again n again with Hindus. Filthy item song must be banned and removed from all platforms.
– Arrest Sunny Leone & the entire team behind the song pic.twitter.com/lmjXs270wJ
— କୁମାର ସଞ୍ଜୟ ?? (@sanjaybulan) December 27, 2021
Yes , We all of us should demand to #ArrestSunnyLeon
I demand to Arrest Sunny Leone Bcoz There’s no place in India for those who disrespect Sanatan Dharma. pic.twitter.com/KyE9wVEg0K
— Kshama gupta (@kshamagupta12) December 27, 2021
1960 मधील ‘कोहिनूर’ चित्रपटातील गाण्याचा रिमेक
सनी लियोनीच्या ज्या गाण्यावर सध्या वाद निर्माण झाला आहे, ते 1960 मध्ये आलेला चित्रपट कोहिनूर मधील ‘मधुबन में राधिका नाचे’ या गाण्याचा रिमेक आहे. गायिका कनिका कपूर आणि गायसक अरिंदम चक्रवर्ती यांनी गायलं आहे. तर गणेश आचार्य यांनी हे गाणं कोरियोग्राफ केलं आहे. हे गाणं श्रीकृष्ण आणि राधा यांच्या प्रेमावर आधारित आहे. लोकांचं मत आहे की सनी लियोनीच्या बोल्ड डान्स मूव्ह्समुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.
इतर बातम्या :