Video: आर्यनला जामीन मिळाल्यानंतर शाहरुखचा रईस चित्रपटातील सीन व्हायरल, फॅन्सकडून आनंद व्यक्त

आर्यन खानच्या जामीन याचिकेवर सलग तीन दिवस सुनावणी घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी त्याला जामीन देण्याचा निर्णय घेतला. या बातमीनंतर आर्यन आणि शाहरुखचे चाहते खूप खूश झाले असून ते सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त करत आहेत.

Video: आर्यनला जामीन मिळाल्यानंतर शाहरुखचा रईस चित्रपटातील सीन व्हायरल, फॅन्सकडून आनंद व्यक्त
आर्यन खानला जामीन, चाहत्यांकडून आनंद व्यक्त
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 11:26 AM

तुम्हा सर्वांना माहित असेलच की, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलमधून अटक केली होती. त्याच्यासोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनाही अटक करण्यात आली होती. आर्यन खानच्या जामीन याचिकेवर सलग तीन दिवस सुनावणी घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी त्याला जामीन देण्याचा निर्णय घेतला. या बातमीनंतर आर्यन आणि शाहरुखचे चाहते खूप खूश झाले असून ते सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त करत आहेत. (Aryan Khan got bail scene of Father Shahrukh Khan film went viral Rais Film SRK Film)

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ शाहरुख खानच्या रईस या चित्रपटातील आहे, ज्यामध्ये शाहरुख तुरुंगातून बाहेर येताना दिसत आहे. त्याचवेळी, या सीनमध्ये उपस्थित असलेले लोक देखील त्यांना बाहेर येताना पाहून खूप आनंदित झाले आहेत आणि ते सर्वजण हा आनंद साजरा करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, लोक त्यांच्या प्रतिक्रियाही शेअर करत आहेत.

शाहरुखचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर पाहायला मिळत आहे. जागरुक नागरीकच्या पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर आतापर्यंत हजारो लाईक्स आणि कमेंट्स पाहायला मिळत आहेत. सोशल मीडिया युजर्सना हा व्हिडिओ इतका आवडला आहे की त्यांना तो पुन्हा पुन्हा पाहणं आवडत आहे.

व्हिडीओ पाहा:

या व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘कोणताही व्यवसाय छोटा नसतो आणि व्यवसायापेक्षा कोणताही धर्म मोठा नसतो’ दुसर्‍या यूजरने लिहिले की, ‘हा शाहरुखच्या उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे.’ आर्यन खानच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय देताच सेलिब्रिटींच्या प्रतिक्रियाही पाहायला मिळाल्या. कोर्टाच्या निर्णयानंतर आर माधवनने ट्विट केले आणि लिहिले – देवाचे आभार. वडील म्हणून मला हायसे वाटते. आशा आहे की सर्व चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी घडतील. अभिनेता सोनू सूदने ट्विट करून लिहिले – जेव्हा वेळ न्याय देते तेव्हा साक्षीदारांची गरज नसते.

हेही पाहा:

Video: माणिके मागे हितेच्या नव्या व्हर्जनची नेटकऱ्यांमध्ये क्रेझ, गाणं ऐकूण म्हणाले, या संगीतातच जादू आहे!

Video: सासरी जाताना वधूचा आनंदोत्सव, आईचेही अश्रू पुसले, नेटकरी म्हणाले, नवरी असावी तर अशी!

 

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.