4 राज्यांच्या निकालानंतर भन्नाट मीम्स व्हायरल; तुम्हालाही होईल हसू अनावर!

चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांनंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव होऊ लागला आहे. हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. भाजपने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड ही तीन राज्ये काबिज केली आहेत. त्यावरून नेटकऱ्यांनी भन्नाट मीम्स शेअर केल्या आहेत.

4 राज्यांच्या निकालानंतर भन्नाट मीम्स व्हायरल; तुम्हालाही होईल हसू अनावर!
निकालानंतर मीम्सचा वर्षावImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Dec 04, 2023 | 1:30 PM

मुंबई : 4 डिसेंबर 2023 | चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांनी भारतीय जनता पक्षाचं बळ आणखी वाढवलंय. तर काँग्रेसला उत्तर भारतातून जवळपास हद्दपार केलंय. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदारांनी दाद दिली. मोदींचा प्रभाव मतदारांवर असल्याचं या निकालांनी स्पष्ट केलं. दक्षिणेतील तेलंगणमधील सत्ताविजय हीच काँग्रेससाठी जमेची बाजू ठरली. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होण्यापूर्वी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगण ही तीन राज्ये काँग्रेसच्या हाती जातील आणि राजस्थान हे एकमेव भाजपकडे जाईल, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला होता. मात्र प्रत्यक्षात भाजपला एकामागून एक विजय मिळाला. या निकालानंतर काँग्रेस आता हिमाचल प्रदेश, तेलंगण आणि कर्नाटक या तीन राज्यांतच एकहाती सत्तेत उरला आहे. या निकालानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला आहे.

निवडणुकीचा निकाल पाहताना प्रत्येक भारतीय पित्याची अवस्था कशी होती, याबद्दलचा हा भन्नाट मीम

हे सुद्धा वाचा

एक्झिट पोल आणि प्रत्यक्षातील निकाल यातील फरकावरून काँग्रेसची उडवलेली खिल्ली

भाजपने छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातही प्रचाराची तीव्रता वाढवली होती. मोदी आणि अमित शहा यांच्या सभांचा धडाका, नियोजनबद्ध प्रचार आणि सरकारी योजनांची प्रसिद्धी यांच्या मदतीने भाजपने विजयाची पार्श्वभूमी तयार केली. त्यामुळे निकाल लागल्यानंतर आनंद साजरा करताना मोदी आणि शहा..

राजस्थानमधील भाजपच्या विजयामुळे दर पाच वर्षांनी सत्ताबदलाची परंपरा राजस्थानी मतदारांनी कायम राखली. यावरूनही भन्नाट मीम्स व्हायरल..

राजकीय नेत्यांच्या अवस्थेवर मीम्स..

मध्य प्रदेशात 230 पैकी 163 जागांसह भाजपने दोन तृतियांश बहुमत मिळवलं. तर छत्तीसगडमधील चित्रही भाजपच्या व्यूहरचनेनं फिरवून टाकलं. तिथे 90 पैकी 56 जागा जिंकत भाजपने सत्ता काबिज केली. राजस्थानात 115 जागा जिंकून भाजपने उत्तरेतील काँग्रेसचं मोठं राज्य ताब्यात घेतलं. एकामागून एक पराभव होत असताना तेलंगणमधील विजय काँग्रेसला किंचित दिलासा देऊन गेला. के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीला मागे टाकून काँग्रेसने 64 जागांसह राज्य जिंकलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.