ATM घुसला साप, पैसे काढायला एकजण गेला आणि…
ATM मध्ये साप दिसला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? नक्कीच सापाला पाहताच तुम्ही घाबरून जाल आणि घाबरून ओरडू लागाल. अशा गोष्टींचा तर विचार सुद्धा करवत नाही. नुकताच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने लोकांना विचार करायला भाग पाडले. एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक साप मशीनच्या आत शिरताना दिसत आहे.
मुंबई: ATM किती महत्त्वाचं असतं? आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते आहे एटीएम! पैसे काढायचे म्हणले की सगळ्यात महत्त्वाचं असेल तर हेच “ATM”! विचार करा तेच जर बंद पडलं तर? कल्पना करा तुम्ही पैसे काढायला गेलात आणि त्या मशीनमध्ये साप दिसला तर? एटीएममध्ये साप दिसला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? नक्कीच सापाला पाहताच तुम्ही घाबरून जाल आणि घाबरून ओरडू लागाल. अशा गोष्टींचा तर विचार सुद्धा करवत नाही. नुकताच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने लोकांना विचार करायला भाग पाडले. एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक साप मशीनच्या आत शिरताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एटीएम मशीनमध्ये अचानक एक साप घुसला. साप प्रथम स्क्रीनवर रेंगाळताना दिसतो आणि डिस्प्लेच्या अगदी वरच्या मोकळ्या जागेत प्रवेश करतो. काही सेकंदात साप मशीनमध्ये पूर्णपणे शिरतो. तिथे पैसे काढण्यासाठी गेलेल्या माणसाला हा सगळं प्रकार दिसतो. पुढे काय होतं हे या व्हिडिओमध्ये दिसलेलं नाही. पण हा व्हिडीओ पाहताना आपणही तितकेच घाबरतो हे नक्की. व्हिडीओ मधल्या माणसाचे काय झाले, त्या सापाचे काय झाले यातलं काहीही यात पुढे दिसत नाही.
Kya saanp ko bhi paise ki jarurat padti hai? ??????? pic.twitter.com/10YH3Vm7Oz
— Hasna Zaroori Hai ?? (@HasnaZarooriHai) July 8, 2023
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. लोक यावर भरपूर मीम्स बनवत आहेत. अनेक युजर्सनी कमेंट केली की, साप पैसे काढण्यासाठी मशीनमध्ये घुसला. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. आणखी एका युजरने लिहिलं, ‘हो, सापाला डेटवर घेऊन जावं लागतं.’ तर दुसऱ्या युजरने लिहिलं, ‘सापाला पैशांची गरज आहे.