ATM ची तोडफोड नाही, चावीने उघडले नाही, तरीही 25 लाख रुपये केले लंपास, कसे? या चोरीने सर्वांनाच हादरवले
खगडिया जिल्ह्यातील बलुही येथे एक अनोखी चोरीची घटना घडली आहे. चोरट्याने एटीएम मशीन न फोडता 25 लाख रुपये लंपास केले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास करत आहे.

खगडिया जिल्ह्यातील बलुही येथे नुकतीच एक चोरीची घटना घडली आहे. येथील आयडीबीआय बँकेच्या एटीएम मधून चोरट्यांनी 25 लाख रुपयांची चोरी केली आहे. शुक्रवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास दोन गुन्हेगार हेल्मेट आणि मास्क घालून एटीएम मध्ये आल्याचे एटीएम च्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले आहे. चोरी करण्यासाठी आलेल्या तरुणापैकी एक जण बाहेर थांबला तर दुसऱ्याने एटीएम मध्ये जाऊन चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या प्रकरणांमध्ये एटीएमची तोडफोड झालेली नसून एटीएम मध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कागद चिटकवण्यात आला होता.
बँकेचे दोन कर्मचाऱ्यांकडे असलेला पासवर्ड चोरट्यांनी वापरल्याचे स्पष्ट झाले. बँकेने दिलेल्या माहितीनुसार एटीएम मधील लॉक मध्ये दोन वेगवेगळे पासवर्ड आहे. जे बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांकडे आहेत. एटीएम चे लॉक हे तेव्हाच उघडल्या जाते जेव्हा हे दोघेजण एकत्र येवून तो पासवर्ड टाकतात. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांनी मिळून ही चोरी केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे एटीएम बँकेच्या शेजारी आहे. सोमवारी व्यवस्थापक चंदन कुमार यांना या प्रकरणाची माहिती मिळताच एकाच खळबळ उडाली होती. बँकेच्या व्यवस्थापकाने स्थानिक लोकांना माहिती दिली आयडीबीआय बँकेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. या चोरीचा तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. सायबर गुन्हेगाराने पासवर्ड हॅक केला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही घटना घडल्यानंतर सगळीकडे भीतीचं वातावरण पसरले.




एसडीपीओ सुमित कुमार यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी रामस्वार्थ पासवान आणि इतर पोलीस पथकाने प्राथमिक तपास केला. बँके कडूनही प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. बँक मॅनेजरने सांगितले की शुक्रवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास एटीएम मध्ये 17 लाख रुपये जमा झाले. एटीएम मध्ये आठ लाख रुपये आधीचे होते. शनिवारी आणि रविवारी बँक बंद असल्याने या घटनेबद्दल तात्काळ समजले नाही. शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी रामस्वार्थ पासवान यांनी सांगितले की प्राथमिक तपास करण्यात आला असून बँकेकडूनही चौकशी केली जात आहे. फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून अद्याप पर्यंत बँकेने लेखी तक्रार दिलेली नाही.