भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये नृत्याची एक वेगळीच आवड निर्माण झाली आहे. पण भारतातील अनेक गाणी लोकांना नाचायला लावतात. जेव्हा आपण एखाद्या परदेशी माणसाला भारतीय वेशभूषा परिधान करताना पाहतो, तेव्हा आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटतो. हा व्हिडिओ पाहून देखील असंच काहीसं होईल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक ऑस्ट्रेलियन महिला एका भारतीय पुरुषासोबत आहे. डान्स पाहून भारतीय गाणी प्रचंड गाजतात हेही कळून येतं.
ही महिला सलवार सूट घालून हरियाणवी गाण्यावर डान्स करत आहे. व्हिडिओमध्ये दिसणारे कपल खरंतर पती-पत्नी आहेत.
निर्भीडपणे नाचणाऱ्या या महिलेला पाहून सोशल मीडियावर चर्चाच चर्चा सुरु झालीये. हा व्हिडिओ पाहून लोक स्वत:ला त्या महिलेचं कौतुक करण्यापासून रोखू शकत नाहीत. या गोंडस व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे.
इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘वर्ल्ड फेमस हरियाणवी’ असं लिहिण्यात आलं आहे.
हा व्हिडिओ १.४ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. कमेंट सेक्शनमध्येही लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसले.