6 कोटी सॅलरी, राहण्यासाठी फ्री घर, तरीही कोणी नोकरीसाठी अर्ज करत नव्हतं, का?
जिथे लोकांना शोधूनही चांगली नोकरी सापडत नाहीय. तिथे एखाद्याला 6 कोटी पॅकेज आणि राहण्यासाठी चार खोल्यांच आलिशान घर मिळत असूनही कोणी नोकरीसाठी अप्लाय करत नसेल, तर काय म्हणाल?
सध्याच्या जमान्याता वाढत्या लोकसंख्येमुळे नोकऱ्या कमी होत चालल्या आहेत. एका पोस्ट असेल, तर हजारो लोक अप्लाय करतात. तुमच्या लक्षात असेल, काही काळापूर्वी पुण्यातून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात वॉक इन इंटरव्यूसाठी तीन हजारपेक्षा जास्त इंजिनिअर्सनी गर्दी केली होती. असच दृश्य मागच्यावर्षी हैदराबादमध्ये पहायला मिळालं होतं. या अशा स्थितीमध्ये समजा एखाद्याला 6 कोटी पगार आणि राहण्यासाठी फ्री मध्ये घर मिळत असेल, तर तो नोकरीसाठी अर्ज करणार नाही का?. पण हे असं घडलय. मागच्यावर्षी ऑस्ट्रेलियातील अशीच एक नोकरी चर्चेत आली होती. पण आता त्यांना उमेदवार मिळाला आहे.
news.com.au रिपोर्ट्नुसार पश्चिम ऑस्ट्रेलियात कॅराडिंग नावाचा एक गाव आहे. इथे बहुतांश लोक शेतीवर अवलंबून आहेत. इथे कोणी डॉक्टर नाहीय. हे गाव शहरापासून खूप लांब आहे. त्यामुळे इथे कोणी डॉक्टर यायला तयार नसतो. इथे एक जनरल प्रॅक्टिशनर होता, ज्याचा मागच्यावर्षी मार्चमध्ये कॉन्ट्रॅक्ट संपला. तेव्हापासून या गावात दुसरा डॉक्टर आलेला नाही. अशावेळी स्थानिक प्रशासनाने डॉक्टरसाठी एक मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे 6 कोटी रुपये आणि राहण्यासाठी चार खोल्यांच घर असं पॅकेज ऑफर केलं. मात्र, तरीही कोणी अर्ज केला नाही. कारण एकच होतं, शहरापासून खूप लांब अंतर.
म्हणून घसशीत पॅकेजची ऑफर
अखेर जानेवारी 2024 मध्ये 600 लोकसंख्येच्या या गावाला डॉक्टर मिळाला. स्थानिक नगरसेवकाने सांगितलं की, आकर्षक ऑफरमुळे काही लोकांनी अर्ज केला होता. त्यातून व्यवस्थित पडताळणी करुन एकाची निवड केलीय. एका रिपोर्ट्नुसार, ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य प्रणालीला डॉक्टरच्या कमतरतेचा सामना करावा लागतोय. खासकर जनरल प्रॅक्टिशनर्स मिळत नाहीयत. तज्ज्ञांनुसार, 2030 पर्यंत 9,298 पूर्णवेळ जीपीची गरज लागेल. म्हणूनच ऑस्ट्रेलियात डॉक्टर्सना घसशीत पॅकेजची ऑफर दिली जातेय.