Mercedes चं पेट्रोल संपलं अन् मदत करतोय रिक्षावाला!
मर्सिडीज बंद पडणार म्हणजे इज्जतीचा फालुदा होणार हा भाग तर वेगळाच पण मदत कोण करणार हा मोठा प्रश्न आहे.
मध्येच पेट्रोल संपले तर गाडी ढकलत न्यावी लागणं हा सर्वात वाईट अनुभव असतो. यात पण अशा संकटकाळी काही देवदूत धावून येतात. काही ऑटो ड्रायव्हर्स आणि बाईकर्स यात इतकी मदत करतात की ज्याची गाडी बंद पडलीये त्याच्यासाठी हे देव असतात. आपल्या सारख्यांची साधीसुधी गाडी बंद पडली की आपल्याला इतकं दुःख होतं. पण विचार करा मर्सिडीज बंद पडली तर? बापरे विचार करवत नाही. मर्सिडीज बंद पडणार म्हणजे इज्जतीचा फालुदा होणार हा भाग तर वेगळाच पण मदत कोण करणार हा मोठा प्रश्न आहे.
पुण्यात एका ठिकाणी असाच किस्सा घडला. एक मर्सिडीज बंद पडली आणि या संकटात रिक्षावाला धावून आला. या रिक्षाने मर्सिडीजला धक्का दिला. थोडक्यात काय तर एका लक्झरी कारला भर रस्त्यात पेट्रोल संपलं म्हणून धक्का द्यावा लागला.
हा व्हिडिओ पुणे, महाराष्ट्रातून सांगितला जात आहे. क्लिपमध्ये लोकेशन कोरेगाव पार्क दिसत आहे. 10 सेकंदांची ही क्लिप पाहून इतक्या महागड्या गाडीलाही अशा धक्क्याची गरज पडू शकते का, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
व्हायरल क्लिपमध्ये लाल रंगाची मर्सिडीज रस्त्यावर धावताना दिसत आहे, मात्र तिला एका ऑटोचालकाने मागून धक्का दिला आहे. प्रत्यक्षात या महागड्या गाडीचं पेट्रोल मध्येच संपलं. ज्यानंतर एका ऑटो चालकाने कार चालकाला मदत केली, त्यांच्या मागे असणाऱ्या कारमध्ये बसलेल्या कुणीतरी हा व्हिडिओ बनवलाय.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @PuneriSpeaks नावाच्या अकाऊंटसह शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदांची ही क्लिप 6 हजार वेळा पाहिली गेली आहे. हा व्हिडिओ लोकांमध्ये अधिकाधिक लोकप्रिय होत चाललाय, कारण असं दृश्य क्वचितच पाहायला मिळतं.
KP ❤️? संकटकाळी मदतीला येणारा एक रिक्षावाला मित्र पाहिजेच…?? pic.twitter.com/qRpcm2F8RX
— पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@PuneriSpeaks) December 15, 2022
एका युझरने मर्सिडीज बेंझला टॅग करत लिहिले की, “दुर्दैवाने, हे तुमच्या कारच्या बाबतीत घडले आहे.” एकूणच हा व्हिडिओ पाहून लोक अवाक झाले आहेत.