अखेर 2.3 फुटांच्या Azeem Mansoori चं लग्न ठरलं! पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगी यांना निमंत्रण देणार
लग्न ठरल्यास तो पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांनाही त्यांच्या लग्नासाठी आमंत्रित करतील असंही म्हणाला होता.
सोशल मीडियावर नुकतीच खळबळ उडवून देणाऱ्या 2.3 फुटांच्या अजीम मन्सुरीचं लग्न अखेर ठरलं असून त्याला नववधू मिळाली आहे. अझीम मन्सुरी गेल्या अनेक वर्षांपासून स्वत:साठी नववधूच्या शोधात होता. अलीकडेच, जेव्हा त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा तो प्रकाशझोतात आला होता. व्हिडीओमध्ये तो म्हणत होता की त्याला लग्न करायचे आहे पण नवरी मिळत नाही. लग्न ठरल्यास तो पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांनाही त्यांच्या लग्नासाठी आमंत्रित करतील असंही म्हणाला होता.
आता अजीम मन्सुरीचं लग्न अखेर ठरलंय. उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील कैरानामधील रहिवासी अझीम मन्सुरीच्या लग्नाची तारीख 7 नोव्हेंबर आहे.
या दिवशी अझीम मन्सुरीचा विवाह हापूरच्या बुशरा हिच्याशी होणार आहे. मन्सुरी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आपल्या लग्नात आमंत्रित करण्याच्या तयारीत आहे. इतकंच नाही तर इतर मोठ्या लोकांनाही निमंत्रण पाठवणार आहेत.
“मी पुढच्या महिन्यात लग्न करणार आहे,” मन्सुरीने एएनआयला सांगितले. मी माझी लग्नपत्रिका पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांनाही देईन. मी दिल्लीला जाऊन त्यांना आमंत्रित करणार आहे. तर दुसरीकडे लग्नाची तयारीही सुरू केली असून शेरवानी शिवायची ऑर्डरही दिली आहे.”
Uttar Pradesh | Azeem Mansoori, a 2.3 feet tall man, in Shamli district, wants to invite PM Modi & UP CM Yogi Adityanath to his wedding as he finally ties the knot in November pic.twitter.com/quhYaUyOKx
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 29, 2022
अझीम मन्सुरी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या लग्नासाठी राजकारणी आणि अधिकाऱ्यांजवळ फेऱ्या मारत होता. अझीम म्हणतो की, त्याच्या लहान उंचीमुळे त्याचे आई-वडील त्याचं लग्न करू शकले नाहीत.