बाबा वेंगाच्या भविष्यवाणीने अमेरिकेचा तिळपापड, कम्युनिस्टांविषयी काय केला दावा?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगा हिच्या या भविष्यवाणीने अमेरिकेचा तिळपापड झाला आहे. भांडवलशाही राष्ट्रांसाठी हे भाकीत झोप उडवणारं आहे. या भाकितानुसार, जगात पुन्हा साम्यवादाची लाट येण्याचा दावा करण्यात येत आहे. काय आहे ती भविष्यवाणी?

बल्गेरियाची भविष्यवेत्ती बाबा वेंगा हिचे 1996 मध्ये निधन झाले. तिच्या भविष्यवाणीमुळे ती लोकप्रिय ठरली. तिने केलेल्या अनेक भविष्यवाण्या जगात खऱ्या ठरल्या. त्यातील एक भविष्यवाणी अमेरिकेसह भांडवलशाहीचा पुरस्कार करणाऱ्या राष्ट्रांसाठी डोकेदुखी ठरली आहे. सध्या दोन तीन देश सोडले तर सत्तेच्या केंद्रस्थानी कम्युनिस्ट नाहीत. तर भारतातही या चळवळीची मोठी पिछेहाट दिसत आहे. या विचारांचे गारूड कमी झालेले नाही. पण ते झाकोळले गेल्याचे चित्र आहे. पण लवकरच जगभरात कम्युनिस्टांची राजवट येईल. या विचारांची सरकार सत्तेत असतील असा दावा बाबा वेंगाने केला आहे.
महत्वाची बाबा म्हणजे, बाबा वेंगा ही अर्धशिक्षित होती आणि त्यांनी स्वत: त्यांच्या दृष्टांतांची नोंद केली नाही. तर त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या भविष्यवाण्या लिहून ठेवल्या. वेंगा या त्यांची भाकीत स्पष्टपणे सांगत नसत. तर त्या गूढ कविता म्हणत. त्यातून मग त्यांचे अनुयायी एक अर्थ लावत. पण त्यांच्या काही गूढ काव्याचे आताशी काही संदर्भ जुळल्याने त्या भाकितांना महत्त्व आले.
2076 पर्यंत साम्यवादाची लाट




वर्ष 2076 पर्यंत जगात पुन्हा साम्यवादाची लाट येईल आणि एक वर्गविरहित समाज उदयास येईल, अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती. 2076 पर्यंत जागतिक स्तरावर साम्यवाद पुन्हा उदयास येण्याची कल्पना अनेकांसाठी थरार असली तरी ही कल्पना तर्काधारित आहे. आता हे भाकीत अचूक ठरणार की नाही हे येणारा काळच ठरवेल.
मानव पृथ्वीवरून होईल नाहीसा
बाबा वेंगाचे हे भाकीत सुद्धा मोठ्या चर्चेत आहे. तिच्या मते, 5079 मध्ये पृथ्वीवर मानव नसेल. त्यांच्या मते, विविध कारणं, नैसर्गिक संकटं यामुळे मानव जता पृथ्वीवर नामशेष होईल. तिचे अस्तित्व संपेल. गूढ काव्य लिहिताना तिने हे भाकीत केल्यावर तिचे अनुयायी चिंतेत सापडले होते.
बाबा वेंगाच्या काही प्रसिद्ध भविष्यवाण्या
बाबा वेंगाच्या भविष्यवाण्या अनेकदा काळाच्या कसोटीवर खऱ्या उतरल्या आहेत.
द्वितीय विश्वयुद्धाचे भाकीत
2004 ची महाभयंकर त्सुनामी
सोव्हिएत संघाचे विघटन
11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकावर झालेला दहशतवादी हल्ला
डिस्क्लेमर : या दाव्यांबद्दल पुरेशी आणि ठोस पुरावे किंवा अधिकृत दस्तावेज उपलब्ध नाही. बाबा वांगा यांच्या भविष्यवाण्या साधारणतः अस्पष्ट आणि विविध अर्थांनी सांगण्यात येतात. हा लेख केवळ माहितीपर आणि चर्चेच्या हेतूने देण्यात आला आहे. या दाव्याची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.