Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga Prediction : Alien आपल्या जवळपास? एलियनचा तो पहिला संदेश…कोणत्या देशाला मिळणार? बाबा वेंगाची भविष्यवाणी डिकोड

Baba Vanga Alien Prediction : बाबा वेंगाच्या भविष्यवाणी केवळ थापा नाहीत हे तिच्या चार भविष्यावाणीवरून अगोदरच सिद्ध झाल्याचा दावा करण्यात येतो. तिने एलियनविषयी ज्या भविष्यवाणी केल्या आहेत, त्यात ही अत्यंत महत्त्वाची मानण्यात येते.

Baba Vanga Prediction : Alien आपल्या जवळपास? एलियनचा तो पहिला संदेश...कोणत्या देशाला मिळणार? बाबा वेंगाची भविष्यवाणी डिकोड
एलियन मानवाला कधी भेटणार?Image Credit source: गुगल
Follow us
| Updated on: Mar 25, 2025 | 4:14 PM

Alien First Message : बाबा वेंगा ही बल्गेरियाची लोकप्रिय भविष्यवेत्ती होऊन गेली. अनेक जण तिची भाकीतं ही टाईमपास म्हणून बघत होती. पण तिच्या चार भविष्यवाण्यांनी जगाचा दृष्टिकोन पालटून टाकला. अमेरिका, ISIS आणि रशियासंबंधीच्या तिची भाकीत जुळल्याने अनेकांची तिच्या गूढ काव्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. आज विज्ञान UFO आणि एलियन गांभार्याने घेत नसले तरी परग्रहावर कोणीतरी असल्याचे नाकारत नाही. त्यातच एलियन विषयी बाबा वेंगाची भाकीत चर्चेचा विषय ठरली आहे.

एलियन आपल्या जवळपासच?

Baba Vanga हिच्या दाव्यानुसार, एलियन लवकरच मानवाशी संपर्क साधतील. मानवाची अंतराळाशी दिवसागणिक दोस्ती वाढत आहे. मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले आहे. आता मंगळ, गुरू आणि शनि त्याला खुणावत आहे. इतकेच नाही तर सूर्याचा अभ्यास सुद्धा सुरू झाला आहे. वेंगाच्या दाव्यानुसार, वर्ष 2125 मध्ये हंगेरी या देशात एलियन सर्वात अगोदर संदेश पाठवतील. या देशात ते कोणाशी पहिला संपर्क करतील हे स्पष्ट होत नाही. पण एलियनशी सातत्याने संपर्क होण्याचे संकेत तिने दिले आहे. आजपासून 100 वर्षांनी 2125 मध्ये एलियन पृथ्वीवर उतरतील आणि हेंगरीतील नागरिकांशी संपर्क साधतील.

हे सुद्धा वाचा

त्या रेडिओ लहरींची जगभरात चर्चा

आपल्यापेक्षा प्रगतशील संस्कृती ब्रह्मांडात अस्तित्वात असल्याचा दावा करण्यात येतो. त्यादृष्टीने वैज्ञानिकांचे संशोधन सुरू आहे. अनेकदा या प्रगत संस्कृतीकडून काही संदेश पकडण्याचा दावा ही करण्यात येतो. एका द्वितारा प्रणालीतून विचित्र रेडिओ संकेत मिळाले होते. ते उर्सा मेजर नक्षत्रात 1,600 प्रकाश वर्ष असल्याचे समोर आले. डॉ. आयरिस डी रुइटर यांनी त्याचा शोध घेतला होता. एका लपलेल्या पांढऱ्या बटु तारा आणि एक लाल बटु ताऱ्यांमध्ये परस्पर संवाद झाल्याचे संकेत सांगत होते. त्यामुळे तारकीय चुंबकीय क्षेत्रे आणि ब्रह्मांडीय रेडिओ उत्सर्जनाविषयी मानवीच्या ज्ञानात आणखी भर पडली आहे.

सध्या बाबा वेंगा हिच्या भविष्यवाणीविषयी सुद्धा असाच दावा करण्यात येत आहे. अर्थात सध्या या भविष्यवाणीचे समर्थन करणारे एक वैज्ञानिक प्रमाण उपलब्ध नाही. पण येत्या काही वर्षात चुंबकीय क्षेत्र, ध्वनीलहरींविषयीचे संशोधन प्रगत टप्प्यात पोहचल्यावर याविषयीच्या दाव्यावर प्रकाश पडू शकतो.

डिस्क्लेमर : या दाव्यांबद्दल पुरेशी आणि ठोस पुरावे किंवा अधिकृत दस्तावेज उपलब्ध नाही. बाबा वांगा यांच्या भविष्यवाण्या साधारणतः अस्पष्ट आणि विविध अर्थांनी सांगण्यात येतात. हा लेख केवळ माहितीपर आणि चर्चेच्या हेतूने देण्यात आला आहे. या दाव्याची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.