बाबा वेंगा नाही, तर या गेमने 13 वर्षांपूर्वीच केली होती अमेरिका-चीनमधील ट्रेड वॉरची भविष्यवाणी
Baba Vanga Prediction : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा मोठा फटका जगाला बसला. त्यात जग भरडून निघाले. तर दुसरीकडे चीन -अमेरिकेत व्यापार युद्ध सुरू झाले. पण या गेमने 13 वर्षांपूर्वीच या ट्रेड वॉरचे भाकीत केले होते, हे तुम्हाला माहिती आहे का?

बाबा वेंगा ही तिच्या भविष्यवाण्यांसाठी लोकप्रिय आहे. पण एका व्हिडिओ गेमने भविष्यवाणी केली, हे जर तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा मोठा फटका जगाला बसला. त्यात जग भरडून निघाले. तर दुसरीकडे चीन -अमेरिकेत व्यापार युद्ध सुरू झाले. पण या गेमने 13 वर्षांपूर्वीच या ट्रेड वॉरचे भाकीत केले होते, Call of Duty: Black Ops II हा एक मिल्ट्री गेम आहे. त्यात ही ट्रेड वॉर ज्या दिवशी होणार आहे, त्याच्या तारखा पाहिल्या तर तुमचे डोळे विस्फारतील. तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
Call of Duty Black Ops II गेम
Call of Duty Black Ops II हा मिल्ट्री थीमवर आधारीत गेम आहे. हा गेम PC आणि कंसोलवर खेळला जातो. अनेक लोक या गेमविषयी अनिभज्ञ आहेत. या गेमची गोष्ट ही युद्धाच्या आजूबाजूला फिरते. या गेममधील मुख्य खेळाडू या गेमची गोष्ट पूर्ण करण्यासाठी धडपडतो. या गेमचे अनेक भाग आले आहेत. या प्रत्येक भागातील गोष्ट ही हा खेळ खेळणाऱ्याला बांधून ठेवते. या गेमचे ग्राफिक्स अनेकांना या गेमचा मोह सोडवू देत नाहीत. हा गेम खेळताना खेळाडू जणू त्याचाच भाग होऊन जातात. या गेमचे मोबाईल व्हर्जन सुद्धा लोकप्रिय झाले आहे.




एकदम अचूक भाकीत
Call of Duty Black Ops II हा मिल्ट्री थीमवर आधारीत गेम नोव्हेंबर 2012 मध्ये पहिल्यांदा आला होता. या गेममध्ये वर्ष 1980 आणि 2025 या काळा दरम्यानची गोष्ट आहे. या गेममध्ये वर्ष 2025 मध्ये शीतयुद्धा सारखी परिस्थिती दाखवण्यात आली आहे. यामध्ये व्यापार, आधुनिक शस्त्र आणि ड्रोन्सचा वापर केंद्रस्थानी आहे. या गेममध्ये दाखवल्या प्रमाणे चीनमधील स्टॉक मार्केटवर सायबर हल्ला होतो. त्याचा बदला घेण्यासाठी चीन काही दुर्मिळ खनिजांची विक्री, व्यापार थांबवतो. त्यामुळे दोन महासत्ता तिसर्या विश्व युद्धाच्या उंबरठ्यावर येतात.