VIDEO | जंगलात फोटोग्राफी करणाऱ्या व्यक्तीसमोर अचानक सिंह उभा राहिला, मग आनंद महिंद्रा यांनी प्रश्न विचारला
आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवरती एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी दोन प्रश्न विचारले आहेत. १२ सेकंदाचा व्हिडीओ आहे. त्यामध्ये एका फोटोग्राफरच्या समोर अचानक सिंह आला आहे.
मुंबई : भारतातील प्रसिध्द उद्योजक आनंद महिंद्रा (anand mahindra latest tweet) सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. ते चांगल्या आणि लोकांच्या फायद्याच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करीत असतात. आतापर्यंत त्यांनी अनेक चांगल्या गोष्टी ट्विटरच्या माध्यमातून (anand mahindra twitter) शेअर केल्या आहेत. सध्या आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवरती (viral video) एक व्हिडीओ शेअर केला आहे. तो व्हिडीओ अधिक लोकांनी पाहिला सुध्दा आहे. अनेकांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसला आहे. जंगल फिरण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीच्या समोर अचानक सिंह आला आहे. दोघंही एकमेकांकडे पाहत आहेत.
व्हिडीओ शेअर करीत असताना आनंद महिंद्रा…
व्हायरल झालेला व्हिडीओ १२ सेंकदाचा आहे. व्हिडीओ जंगलातील आहे, एक व्यक्ती जंगल पाहण्यासाठी गेली आहे. त्याच्यासोबत एक जीप आहे, त्या जीपच्या बोनेटवरती ती व्यक्ती बसली आहे. ती व्यक्ती जंगलातील काही गोष्टी पाहत आहे. त्याचवेळी अचानक त्या व्यक्तीच्या समोर सिंह येऊन उभा राहतो. सिंहाला पाहून ती व्यक्ती प्रचंड घाबरली आहे, त्याचबरोबर ती व्यक्ती जिथं बसली आहे. तिथं घट्ट पकडून बसली आहे. बस्सं त्याचवेळी व्हिडीओ संपतो. हा व्हिडीओ शेअर करीत असताना आनंद महिंद्रा यांनी दोन प्रश्न विचारले आहेत.
If you were that man: 1) What would your first thought be? 2) What would your first action be? pic.twitter.com/UGLw4m2yBf
— anand mahindra (@anandmahindra) June 10, 2023
व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना धक्का बसला
आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटरवरती हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करीत असताना कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, समजा ती व्यक्ती तुम्ही असता, तर तुमच्या मनात पहिला विचार काय आला असता, दुसरं असा की अशा परिस्थिती तुम्ही काय केलं असतं. ही पोस्ट आतापर्यंत 1.3 मिलियन लोकांनी पाहिली आहे. आठ लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. त्या व्हिडीओला लोकांच्या वेगवेगळ्या कमेंट आल्या आहेत. एक युजर म्हणतो, मी मम्मी म्हणून ओरडलो असतो. दुसरा म्हणतो, मला देवाची आठवण झाली असती.