बॅचलर मुलाच्या घरात सगळीकडं बिअरच्या बॉटल, घराचा मालक म्हणाला…
संपुर्ण घरात बिअरच्या बाटल्या दिसत आहेत. किचन कट्ट्यावर सगळीकडे कचरा पडला आहे. संपूर्ण घरात इतकी घाणं केली आहे की, मालक अधिक संतापला आहे.
मुंबई : एका बॅचलर (Bachelor) मुलाला घर शोधणं अधिक कठीण असतं. ज्यांच्याकडे एखादं अधिक घर आहे, अशी लोकं एखाद्या कुटुंबाला राहायला घर देतात. बॅचलर मुलांना राहायला कोणी घरं देत नाही. काही अशी लोकं असतात, ती लोकं फक्त विद्यार्थ्यांना (students) आणि नोकरी निमित्त एकटे राहणाऱ्या तरुणांना घर राहायला देतात. परंतु राहायला देताना ते अधिक अटी घालत असल्याचं पाहायला मिळालं आहे. एका बॅचलर मुलाला घर भाड्यानं (rent home) दिल्यानंतर काय अवस्था झाली आहे. हे तुम्ही फोटो पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ? या कारणामुळं मुलांना घर भाड्याने द्यायला लोकं घाबरतात.
एका बेंगलोरमधील घर मालकासोबत काय झालंय पाहा. शेअर झालेले फोटो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. एक बॅचलर मुलगा ज्यावेळी घर खाली करुन गेला, त्यानंतर मालकाने जाऊन घरं पाहिलं, घर पाहिल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. त्या मुलाने घराची एकदम वाईट अवस्था केली आहे. मालकाने घर खाली केल्याचे काही फोटो काढले आहेत.
रवि हांडा या व्यक्तीने हे सगळे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांना हे सगळे फोटो रेडिट इथून मिळाली आहेत. त्यांनी लिहिलं आहे की, घरं शिकलेल्या अविवाहीत व्यक्तीला दिलं आहे. ज्यावेळी त्याने घर सोडलं. त्यावेळी त्याने केलेली घराची अवस्था तुम्हाला फोटोमध्ये दिसत आहे. तो अशा अवस्थेत घर सोडून गेला आहे. त्याचबरोबर तो एमएनसीमध्ये काम करीत असल्याचं म्हटलं आहे.
संपुर्ण घरात बिअरच्या बाटल्या दिसत आहेत. किचन कट्ट्यावर सगळीकडे कचरा पडला आहे. संपूर्ण घरात इतकी घाणं केली आहे की, मालक अधिक संतापला आहे.
हे सगळे फोटो रवि हांडा यांनी ट्विटरवर शेअर केली आहेत. या कारणामुळे बॅचलर मुलांना घरं भाड्याने द्यायला लोकं घाबरतात. एक मल्टी नॅशनल कंपनीमध्ये काम करणारा शिकलेला अविवाहीत तरुणाने काय केलंय पाहा. हे सगळे रवि हांडा यांना Reddit मधून मिळाली आहेत.
This is why people don’t like renting to bachelors.
An “educated” bachelor working in a “large MNC” did this in Bangalore.
Got these pics from Reddit. pic.twitter.com/LbYhEk9hx5
— Ravi Handa (@ravihanda) April 26, 2023
बेंगलोरमधील एका घर मालकाने हा प्लॅट बॅचलर मुलाला दिला होता. तो मुलगा एका मोठ्या कंपनीत कामाला होता. तीन ते चार महिने घराचं भाडं दिल्यानंतर बॅचलर मुलगा अचानक गायब झाला. त्यानंतर त्याने अचानक सांगितलं की, घर खाली करायचं आहे आणि त्याला घरासाठी दिलेलं डिपॉझिट परत पाहिजे.