Sahdeo Dirdo video : ‘बचपन का प्यार’फेम ‘सहदेव दिर्दो’नं केली ‘बच्चन पांडे’ची कॉपी, म्हणाला…

Sahdeo Dirdo latest Video : अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि क्रिती सॅनन (Kriti Sanon) स्टारर 'बच्चन पांडे' (Bachchan Pandey) चित्रपटाचे डायलॉग्स लोकांना आवडत आहेत. सहदेव दिर्दो 'बच्चन पांडे'चा डायलॉग लिप सिंक (Lip sync) करताना दिसत आहे.

Sahdeo Dirdo video : ‘बचपन का प्यार’फेम 'सहदेव दिर्दो'नं केली 'बच्चन पांडे'ची कॉपी, म्हणाला...
बच्चन पांडेच्या डागलॉग्सवर लिपसिंक करताना सहदेव दिर्दोImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 4:50 PM

Sahdeo Dirdo latest Video : अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि क्रिती सॅनन (Kriti Sanon) स्टारर ‘बच्चन पांडे’ (Bachchan Pandey) हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचण्यात तितकासा यशस्वी ठरला नसला तरी सोशल मीडियावर या चित्रपटाचे डायलॉग्स लोकांना आवडत आहेत. आता ‘बचपन का प्यार’फेम सहदेव दिर्दो यानेही या ट्रेंडमध्ये उडी घेतली आहे. त्याचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो ‘बच्चन पांडे’चा डायलॉग लिप सिंक (Lip sync) करताना दिसत आहे. सहदेव दिर्दोच्या या स्टाइलला सोशल मीडिया यूझर्सकडून खूप पसंती मिळत आहे. मात्र, काही लोकांनी या व्हिडिओवर मजेदार कमेंटही केल्या आहेत. अक्षय कुमारचा बच्चन पांडे हा चित्रपट 18 मार्च रोजी प्रदर्शित झाला होता, परंतु अनुपम खेरच्या ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटासमोर तो फिका पडला. चित्रपटाकडून अपेक्षेप्रमाणे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करत नाहीये.

बच्चन पांडेचे डायलॉग्स ट्रेंडमध्ये…

सोशल मीडियाच्या जगात बच्चन पांडेचे डायलॉग्स ट्रेंडमध्ये आहेत. त्यातील एक म्हणजे ‘गॉड फादर बोलते हैं…’ यावर प्रत्येकजण रिल बनवून शेअर करत आहेत. आता ‘बचपन का प्यार’फेम सहदेव दिर्दो या डायलॉगवर लिप सिंक करून सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे. त्याचा हा व्हिडिओ इंटरनेटवर लोकांना खूप आवडला आहे. चला तर मग हा व्हिडिओ पाहू या…

इन्स्टाग्रामवरून शेअर

छत्तीसगडच्या सहदेव दिर्दोने 24 मार्चला हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, की ‘गॉड फादर बोलते हैं…’ या व्हिडिओला आतापर्यंत 4 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. सहदेव दिर्दोच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. सहदेव दिर्दो याच्या वेगळ्या शैलीचे त्यांनी भरभरून कौतुक केले आहे. यासोबतच अनेक चांगल्या कमेंट्सही केल्या आहेत. मात्र, अनेक यूझर्सनी यावर मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

व्हायरल गाण्याची झाली होती चर्चा

गेल्या वर्षी जुलैमध्ये सहदेव दिर्दोचे ‘बचपन का प्यार’ हे गाणे इंटरनेटवर चांगलेच व्हायरल झाले होते. यानंतर रॅपर बादशाहने याचे रिमिक्स व्हर्जन तयार केले आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. त्यानंतर या व्हायरल गाण्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर ऑगस्टमध्ये बादशाहने सहदेवसोबत त्याची संपूर्ण रिमिक्स आवृत्ती तयार केली. दरम्यान, तो दररोज त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून व्हिडिओ पोस्ट करत असतो.

आणखी वाचा :

‘या’ देशी स्पायडरमॅनला पाहिलं का? चिखल आणि पाणीही याचा रस्ता रोखू शकलं नाही, Jugaad video viral

बाजूला चित्ता असूनही घाबरत नाही हरीण, काय कारण? पूर्ण पाहा ‘हा’ Viral video

केळाची सालं रस्त्यावर फेकणाऱ्यांना काय सांगतेय ही चिमुकली? Video viral

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.