मुंबई: सोशल मीडियावर जर लोकांना एखाद्या गाण्याचं वेड लागलं की तेच गाणं बराच वेळ चालतं आणि त्याचा ट्रेंड येतो. सध्या “आमच्या पपांनी गणपती आणला” हेच गाणं सगळीकडे ऐकू येतंय. जो तो उठतोय याच गाण्यावर व्हिडीओ करतोय. या गाण्यांच्या वादळात मध्यंतरी असंच एक गाणं व्हायरल झालं होतं, “बादल बरसा बिजुली”! आठवलं? या गाण्याचं लोकांना अक्षरशः वेड लागलं होतं. अहो कधी नाही ते मुलांचा ग्रुप सुद्धा या गाण्यावर थिरकत होता. सोशल मीडिया युजर्सला तर नंतर-नंतर हे गाणं ऐकून कंटाळा आला होता. या , “बादल बरसा बिजुली” वर अनेकांचे प्रयोग करून झाले. आपल्यालाही वेगवेगळे प्रकार पाहायला मिळाले. पण तुम्हाला माहितेय का “बादल बरसा बिजुली” चा सगळ्यात बेस्ट व्हिडीओ कोणता आहे? हा व्हिडीओ बघा, हा प्रचंड व्हायरल होतोय.
एक गोंडस मुलगा शाळेच्या गॅदरिंग मध्ये त्याच्या “बादल बरसा बिजुली” या आवडत्या गाण्यावर नाचताना दिसतोय. या मुलाने शाळेचा गणवेश घातलाय. हा मुलगा या गाण्याचा चांगलाच आनंद घेतोय. त्याला बघून प्रत्येकालाच या गाण्यावर नाचायची इच्छा होईल अशा पद्धतीने तो छान एन्जॉय करतोय. “बादल बरसा बिजुली” चा बहुधा हा सगळ्यात भारी व्हिडीओ असावा. तो नाचत असताना खाली उभे असणारे विद्यार्थी सुद्धा याची मस्त मजा घेतायत.
duskndawn.xo या इंस्टाग्राम अकाऊंट वरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये या गोंडस मुलाला त्याचे शिक्षक सुद्धा प्रोत्साहन देताना दिसतायत. या गाण्याचा व्हिडीओ खरं तर तेव्हा फेमस झाला होता जेव्हा दोन सुंदर मुलींनी यावर डान्स केला होता. लोकांनी या व्हिडिओला अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. विशेष म्हणजे या मुलींच्या डान्सच्या स्टेप्स सुद्धा जशाच्या तशा कॉपी केल्या जातायत. हा चिमुकला सुद्धा त्याच व्हिडिओला कॉपी करताना दिसतोय.