Video | मित्राच्या पार्टीसाठी बालकनीत जमले, मध्येच घडला असा प्रकार की दोघे गंभीर जखमी, पाहा व्हिडीओ

मालीबू बीचवरील एका बंगल्यावर क्षमतेपेक्षा जास्त मित्रांना जमवल्यामुळे बंगल्याची बालकनी चक्क कोसळली आहे. a(balcony collapsed malibu beach)

Video | मित्राच्या पार्टीसाठी बालकनीत जमले, मध्येच घडला असा प्रकार की दोघे गंभीर जखमी, पाहा व्हिडीओ
beach viral video
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 4:13 PM

मुंबई : सांगितलेले नियम आणि दिलेल्या सूचना न पाळल्यामुळे कधीकधी गंभीर घटना घडतात. कधीकधी तर सहज झालेल्या चुकांमुळे प्राणसुद्धा गमवावे लागल्याचे प्रकार समोर आलेले आहेत. सोशल मीडियावर तसे काही व्हिडीओसुद्धा उपलब्ध आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. घरमालकाने बर्थडे पार्टीमध्ये जास्त लोकांना न जमवण्याचा सल्ला दिलेला असूनही दुर्लक्ष केल्यामुळे एक भीषण घटना घडली आहे. मालीबू बीचवरील (Malibu beach) एका बंगल्यावर क्षमतेपेक्षा जास्त मित्रांना जमवल्यामुळे बंगल्याची बालकनी चक्क कोसळली आहे. हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय. (balcony collapsed in Malibu beach four injured video goes viral)

नेमकं काय घडलं ?

सध्या सोशल मीडियावर एक हादरवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक बालकनीमध्ये उभे असल्याचं दिसतंय. मात्र, थोड्या वेळाने ही बालकनी अचकान कोसळलीये. ही बालकनी अचानक कोसळल्यामुळे त्यातील सर्व लोक थेट समुद्रात पडल्याचे दिसतेय. या घटनेमध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. हा थरार सगळा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मालीबू (Malibu) बीचवर ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बालकनीवर जवळपास 15 लोक जमले होते. वजन जास्त झाल्यामुळे ही बालकनी थेट समुद्रात कोसळली आणि या घटनेत एकूण चार जण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सुदैवाने या घटनेत कोणाचाही मृत्यू झालेला नाही.

प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं ?

या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या एका व्यक्तीने ही घटना नेमकी कशी घडली याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. विशेष म्हणजे ही घटना घडली तेव्हा बालकनीमध्ये त्याचा एक बेस्ट फ्रेंड आणि प्रेमिकासुद्धा उपस्थित होते. या सर्वांना बालकनीतून पडताना पाहून ही व्यक्ती हादरुन गेली होती. या व्यक्तीने “बीचजवळ असलेल्या बंगल्यामध्ये एका बालकनीत अनेकजण उभे राहिले होते. यावेळी बंगल्याचा डेक अचानकपणे तुटला. हा प्रकार मी डोळ्याने पाहिला. हे कसे झाले याबद्दल मी निश्चितपणे सांगू शकत नाही. ही एक अतिशय भीषण घटना होती,” असे या प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

पाहा व्हिडीओ :

पार्टी करण्यास मनाई होती

या घटनेबद्दल बोलताना घराच्या मालकाने हे घर भाड्याने दिले होते असे सांगितले. यावेळी या घरामध्ये फक्त सहा लोकांना राहण्याची परवानगी दिली होती, असेही घरमालकाने सांगितले. तसेच कोणतीही पार्टी करण्यास मनाई केलेली असताना यांनी पार्टीसाठी लोक मजवले, असेसुद्धा स्पष्टीकरण बंगल्याच्या घरमालकाने दिले.

दरम्यान, या घटनेबद्दल परिसरात राहणाऱ्या लोकांनी सविस्तरपणे सांगितले आहे. या घरात तसेच बालकनीत एकूण 30 लोक असावेत असा शेजाऱ्यांचा अंदाज आहे. तसेच बालकनीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक जमल्यामुळे ही घटना घडली असावी, असं पोलिसांचं मत आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Video | स्कुटीचालक मध्ये आला अन् सगळं संपलं, भीषण अपघातामुळे नेटकरी हादरले, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Video | डोक्याला बाशिंग, बाजुला नवरी, नवरदेवाने वाजवला असा ताशा की लोक झाले फॅन, व्हिडीओ व्हायरल

Video | भर लॉकडाऊनमध्ये नव्या जोडप्याची बुलेटवर सफर, पोलिसांनी पकडून ‘असं’ केलं स्वागत की व्हिडीओ व्हायरल (balcony collapsed in Malibu beach four injured video goes viral)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.