जगभरातील अनेक मोठ्या देशांनी गॅसच्या वाहतुकीसाठी समुद्रात गॅस पाइपलाइन टाकल्या आहेत. याच एका गॅस पाईपलाईनचा बाल्टिक समुद्रात खूप मोठा स्फोट झाल्याची एक अतिशय भीतीदायक बातमी समोर आलीये. समुद्रातील नॉर्ड स्ट्रीम या नॅचरल गॅस पाईपलाईन सिस्टीमचा स्फोट झाला आहे. यात धोकादायक मिथेन वायूची गळती मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याचे फोटोही समोर आले आहेत. हे फोटो व्हायरल झालेत.
बाल्टिक समुद्रातील ही घटना आहे. आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार मिथेन गॅस गळतीची ही घटना आतापर्यंतची सर्वात मोठी घटना आहे. इथे दर तासाला सुमारे 23 हजार किलो मिथेन बाहेर पडत आहे. म्हणजेच जगभरात दर तासाला जाळल्या जाणाऱ्या सुमारे तीन लाख कोळश्यांइतकी ती आहे.
इतकंच नाही तर न्यूज एजन्सी रॉयटर्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये या घटनेच्या तीव्रतेचा अंदाज लावला जाऊ शकतो. ही घटना आकाशातूनही दिसते.
The ruptures on the Nord Stream gas pipelines under the Baltic Sea has led to what is likely the biggest single release of climate-damaging methane ever recorded, the United Nations Environment Programme said https://t.co/Nw2ecb5jSL 1/5 pic.twitter.com/UaNXdFCUbW
— Reuters Science News (@ReutersScience) September 30, 2022
हा स्फोट अनेक टीएनटी बॉम्बच्या बरोबरीचा आहे, असं संयुक्त राष्ट्र पर्यावरणाचं मत आहे. त्यामुळे बाल्टिक समुद्राच्या इकोसिस्टिमवर वाईट परिणाम होत आहे.
हे सगळं आटोक्यात आणलं गेलं नाही तर आजूबाजूच्या मोठ्या भागात सागरी प्राण्यांचे मोठे नुकसान होईल. इथे प्रचंड प्रमाणात मिथेन बाहेर पडतोय जो खूप घातक आहे.
बाल्टिक समुद्राच्या तळाशी तुटलेल्या पाइपलाइनमधून मिथेनची गळती होत असल्याने पर्यावरणप्रेमींची चिंता वाढली आहे.
जगभरात मोठ्या प्रमाणावर मिथेन गळतीच्या धोकादायक घटना वेळोवेळी समोर येत असतात, पण ही घटना अगदीच वेगळी आहे. जी वेगाने व्हायरल होतीये.