डॉल सारखं दिसण्यासाठी चेहऱ्याला बार्बी शीट मास्क लावलं, व्हिडीओ बघून हसाल नाहीतर घाबराल!
या क्लिपमध्ये एक महिला चेहऱ्यावर लावलेला बार्बी शीट मास्क दाखवताना दिसत आहे. मात्र, आपण कल्पना केल्याप्रमाणे हा मास्क नाही. एकतर हा व्हिडीओ तुम्हाला घाबरवू शकतो किंवा मोठ्याने हसवू शकतो.
आरोग्याच्या काळजीमध्ये आता चेहऱ्याची काळजी सुद्धा महत्त्वाची मानली जाते. चेहरा नीट ठेवणं, वेळच्या वेळी त्याची काळजी घेणं त्यासाठी योग्य त्या गोष्टी करणं या सगळ्याला स्किनकेअर म्हणतात. लोकांचं आजकाल स्किनकेअर रुटीन सुद्धा असतं. या रुटीनमध्ये चेहऱ्याला कधी काय आणि कसं लावलं पाहिजे याचा समावेश असतो. हे एक फॅड बनलंय. आधी या गोष्टी घरगुती उपायांमध्ये व्हायच्या, पण आता जसजसा काळ पुढे जायला लागलाय मनुष्याने यावर सुद्धा उपाय काढलाय. माणसाने आता शीट मास्क नावाचा प्रकार शोधून काढलाय. या शीट मास्कची मजा अशी आहे की आता हे वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये सुद्धा मिळतं. इतकंच काय तर याचे डिझाईन्स सुद्धा मजेशीर असतात.
होय! यात पांडा डिझाईन येतं, टायगर डिझाईन येतं.बार्बी डिझाईन पण आलंय! हे बार्बी डिझाईन लावल्यावर एखाद्याला वाटेल की आपण बार्बी सारखं दिसू की काय आणि एखादं म्हणून ते शीट मास्क लावत देखील असेल.
पण असं होत नाही. प्रत्यक्षात मात्र बार्बी मास्क लावल्यावर बार्बी न दिसता ही मुलगी अनाबेल दिसतेय. तो चित्रपट आठवतो? अनाबेल? अगदी तशीच! हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय.
आम्ही तुम्हाला इंटरनेटवर धुमाकूळ घालत असलेल्या एका व्हिडिओबद्दल सांगतोय. या क्लिपमध्ये एक महिला चेहऱ्यावर लावलेला बार्बी शीट मास्क दाखवताना दिसत आहे. मात्र, आपण कल्पना केल्याप्रमाणे हा मास्क नाही. एकतर हा व्हिडीओ तुम्हाला घाबरवू शकतो किंवा मोठ्याने हसवू शकतो.
सध्या व्हायरल झालेला हा व्हिडिओ विरलहॉगने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या शॉर्ट क्लिपमध्ये एक महिला बार्बी शीट मास्क दाखवताना दिसत आहे. हे बार्बीच्या ट्रेडमार्क गोल्डन सिग्नेचरसह गोंडस गुलाबी पॅकेजिंगमध्ये होते.
मात्र, ज्या महिलेने ती वापरली, त्या महिलेने तिचा चेहरा दाखवला आणि ती एखाद्या सुंदर बार्बी डॉलसारखी नव्हती. “बार्बी शीट मास्क थोडा हास्यास्पद वाटतो!” पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओला जवळपास 60 हजार व्ह्यूज मिळाले असून इन्स्टाग्राम युजर्सकडून अनेक मजेदार प्रतिक्रिया आल्या आहेत. एका युजरने लिहिले की, ‘नवी भीती, अनलॉक झाली आहे.” एकाने लिहिले, “अरे बार्बी नाही, अनाबेल आहे.”