Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | मांजरीचा अवतार पाहून अस्वलाला पळता भुई थोडी, एका क्षणात पळ काढला, पाहा मजेदार व्हिडीओ

सध्या तर अस्वल आणि मांजराचा एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका इवल्याशा मांजिरीने अस्वलला पाणी पाजलं आहे. मांजरीला पाहून अस्वलाने थेट पळ काढलाय.

Video | मांजरीचा अवतार पाहून अस्वलाला पळता भुई थोडी, एका क्षणात पळ काढला, पाहा मजेदार व्हिडीओ
BEAR AND CAT VIDEO
Follow us
| Updated on: Nov 06, 2021 | 8:20 AM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ आपल्याला चकित करून टाकतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण थक्क होऊन जातो. सध्या तर अस्वल आणि मांजरीचा एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका इवल्याशा मांजिरीने अस्वलला पाणी पाजलं आहे. मांजरीला पाहून अस्वलाने थेट पळ काढलाय.

अस्वलाकडून मांजरीला त्रास 

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एक अस्वल आणि एक मांजर दिसत आहे. सुरुवातीला गार्डनमध्ये एक मांजर खेळताना दिसतेय. नंतर एक अस्वल या मांजरीकडे आलंय. हे अस्वल मांजरीला त्रास देत आहे. काही वेळानंतर मात्र मांजरीला चांगलाच राग आलेला आहे. तिने रौद्ररुप धारण करुन अस्वलाशी दोन हात केले आहेत. मांजर अस्वलावर हल्ला करत आहे.

मांजरीने अस्वलाला पळवून लावलं

मांजरीचा अवतार पाहून अस्वलाला पळता भूई थोडी झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतंय. नंतर मात्र अस्वलाने गार्डनमधून थेट पळ काढलाय. विशेष म्हणजे अस्वल पळून जात असतानादेखील मांजरीने त्याचा पिच्छा सोडलेला नाही. अस्वलाने कुंपनावरुन उडी मारल्यानंतरच मांजर शांत झाल्याचे आपल्याला या व्हिडीओमध्ये दिसतेय. हा सर्व प्रकार पाहून मांजरीने अस्वलाला पाणी पाजलं आहे, असं नेटकरी म्हणत आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ काही क्षणांत सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स करत असून त्याला शेअरदेखील करत आहेत. सध्या हा व्हिडीओ @susantananda3 या अकाऊंटवर पाहता येईल.

इतर बातम्या :

Video: फोटोत मांजर आहे, पण शोधून सापडणार नाही, पाहा आणि सांगा कुठं दिसतेय का?

‘हेरा फेरी’मधल्या ‘राजू’ची साईड पोज पुन्हा व्हायरल, नेटकऱ्यांमध्ये साईड पोझ फोटोचा ट्रेंड सुरु!

महिनाभरानंतर भेटल्यावर अनुपम खेर यांच्या आईने त्यांना शिव्या का घातल्या? पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ

(bear and cat fight went viral on social media)

हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.
खोक्याला वनविभागाच्या कोठडीत जबर मारहाण, अंगावर वळ अन्... फोटो व्हायरल
खोक्याला वनविभागाच्या कोठडीत जबर मारहाण, अंगावर वळ अन्... फोटो व्हायरल.