Video: गर्भवती महिला ट्रेनरवर अस्वलाचा हल्ला, जमिनीवर पाडून नखांचे ओरखडे, हादरवून सोडणारा व्हिडीओ

व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये, निळ्या ड्रेसमधील गर्भवती महिला ट्रेनर एका मोठ्या अस्वलावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते. पण यानंतर काय होते, हे पाहिल्यानंतर अनेकांना भीती वाटल्याशिवाय राहणार नाही.

Video: गर्भवती महिला ट्रेनरवर अस्वलाचा हल्ला, जमिनीवर पाडून नखांचे ओरखडे, हादरवून सोडणारा व्हिडीओ
सर्कसमध्ये महिला ट्रेनरवर अस्वलाचा हल्ला
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 6:36 PM

सोशल मीडियाच्या जगात प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात. यातील काही खूप मजेदार असतात, तर काही असे असतात की ते पाहिल्यानंतर एखाद्याच्या हृदयाचे ठोके चुकतात. सध्या इंटरनेटवर सर्कसचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो पाहिल्यानंतर कुणाच्याही अंगावर शहारा उभा राहू शकतो. व्हायरल व्हिडिओमध्ये एक अस्वल अचानक गर्भवती महिलेवर हल्ला करतं, आणि ते पाहून बसलेले प्रेक्षकही घाबरतात. (Bear attack pregnant trainer in Russian circus during a show video goes viral)

ही धक्कादायक घटना रशियातील ओरिओल शहरातील आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रेक्षक सर्कसमधील प्राण्यांची मजा घेत आहेत. दरम्यान, जेव्हा अस्वलाची वेळ येते, तेव्हा प्रेक्षक जोरजोरात ओरडू लागतात. त्यावेळी अस्वलाची एन्ट्री होते.

व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये, निळ्या ड्रेसमधील गर्भवती महिला ट्रेनर एका मोठ्या अस्वलावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते. पण यानंतर काय होते, हे पाहिल्यानंतर अनेकांना भीती वाटल्याशिवाय राहणार नाही. या प्रयोगादरम्यान अस्वल हिंसक बनतं आणि महिला प्रशिक्षकावर हल्ला करतं. यानंतर, अस्वल त्या महिलेला तिच्या नखांनी पकडतो आणि तिला जमिनीवर पाडतो. हे दृश्य इतके भयावह आहे की, तिथे बसलेले प्रेक्षक खूप घाबरतात, ते आरडाओरडा करतात. दरम्यान, दुसरा प्रशिक्षक त्या महिलेला अस्वलाच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करतो.

पाहा व्हिडीओ:

यूट्यूबवर शेअर केलेला अवघ्या 12 सेकंदांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कुणालाही गूज बम्प्स आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या माहितीसाठी, या दुर्घटनेनंतर महिलेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. ती बाई म्हणते की, तिला दोन ठिकाणी ओरखडे पडले आहे. नशिबाने तिच्या गर्भातील बाळाला काहीच झालं नाही. त्या महिलेचे म्हणणे आहे की, ती गर्भवती होती, यामुळे अस्वल खूप चिडचिड करत होतं. म्हणूनच त्याने तिच्यावर हल्ला केला. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर या अस्वलाच्या कोणत्याही खेळातील वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

हेही पाहा:

शरीर माशाचं आणि तोंड मगरीचं, लाकडाच्या तुकड्याचा क्षणांत भूगा, झारखंडमध्ये सापडलेल्या माशाची नेटकऱ्यांमध्ये चर्चा

Video: 3 तोंडांच्या सापाचा फोटो पाहून नेटकरी घाबरले, पण खरं समजल्यावर विश्वास ठेवणं अवघड, पाहा निसर्गाचा अद्भूत चमत्कार

बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.