Video | कसलीही चिंता न करता कारमध्ये ठाण मांडले, डेअरिंगबाज अस्वलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा अशाच एका प्राण्याचा आहे. या व्हिडीओमध्ये एक अस्वल थेट कारमध्ये जाऊन बसले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video | कसलीही चिंता न करता कारमध्ये ठाण मांडले, डेअरिंगबाज अस्वलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
bear-video
Follow us
| Updated on: Jul 22, 2021 | 7:20 PM

मुंबई : जंगली प्राण्यांचे मानवी वस्तीत शिरण्याचे प्रमाण अलीकडे चांगलेच वाढले आहे. बिबट्या, वाघ, अस्वल तसेच इतर प्राणी मानवी वस्तीत शिरुन चांगलाच धुडगूस घालत आहेत. या घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा अशाच एका प्राण्याचा आहे. या व्हिडीओमध्ये एक अस्वल थेट कारमध्ये जाऊन बसले आहे. (bear enters in car video went viral on social media)

कसलीही चिंता न करता अस्वलाने कारमध्ये ठाण मांडले

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ काहीसा मजेदार आणि थरारकही आहे. या व्हिडीओमध्ये एका अस्वलाने कसलीही चिंता न करता एका कारमध्ये ठाण मांडले आहे. आपल्या कारमध्ये अस्वल जाऊन बसल्याचे समजताच कारची मालकी असलेला माणूस चांगलाच गोंधळला आहे. नंतर त्याने या अस्वलापासून आपली कार मोकळी करण्यासाठी चांगलीच शक्कल लढवली आहे.

माणसाने सावधपणे कारचा दरवाजा उघडला

या माणसाने कारमध्ये बसलेल्या अस्वलाला हाकलण्यासाठी कारचा दरवाजा उघडला आहे. दरवाजा उघडताना या माणसाने मोठी खबरदारी घेतल्याचे दिसतेय. कारमध्ये बसलेले अस्वल हल्ला करण्याची शक्यता असल्यामुळे हा माणूस अतिशय सावधपणे कारचा दरवजा उघडत आहे. शेवटी माणसाने मोठ्या शिताफीने कारचा दरवाजा उघडला आहे.

अस्वल बाहेर येताच लोकांची आरडाओरड

दरवाजा उघडल्यानंर कारमध्ये बसलेले अस्वल हळूच बाहेर आले आहे. त्याने आजूबाजूला बघत थेट जंगलात पळ काढला आहे. हा सर्व प्रसंग कॅमऱ्यात कैद करण्यात आला आहे. कारमधून अस्वल बाहेर आल्याचे समजताच बाकीचे लोक ओरडत आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडीओ पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मजेदार कमेंट्स केल्या असून तो कुठला आहे हे समजले नाही. मात्र, त्याला ट्विटरवर Ffs OMG Vids या अकाऊंटवर शेअर रण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | पाखरालाही आत येण्यास परवानगी नसलेल्या संसदेत उंदराचा धुडगूस, स्पेनच्या खासदारांची तारांबळ

Video | डिजेचा आवाज ऐकताच झोपडीवर चढला, केला मजेदार डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच

Video | नवरीला पाहून नवरदेवाने धरला ठेका, डान्स करताच टाळ्या, शिट्ट्यांचा पाऊस

(bear enters in car video went viral on social media)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.