Video | पांढरे शुभ्र ढग, निळेशार पाणी, वैमानिकाला जग कसं दिसतं ? डोळ्याचे पारणे फेडणारा हा व्हिडीओ पाहाच

एक अतिशय मजेदार आणि डोळ्याचे पारणे फेडणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तसेच व्हिडीओतील  विहंगम दृश्य पाहून नेटकरी त्याला उत्स्फूर्तपणे शेअरही करत आहेत.

Video | पांढरे शुभ्र ढग, निळेशार पाणी, वैमानिकाला जग कसं दिसतं ? डोळ्याचे पारणे फेडणारा हा व्हिडीओ पाहाच
earth view from airplane
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 11:46 PM

मुंबई : आकाशातून फेरफटका मारायला सर्वांनाच आवडतं. निळशार पाणी, मोकळं आकाश पाहून सगळेच भारावून जातात. आकाशात फिरतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरलसुद्धा होतात. सध्या तर एक अतिशय मजेदार आणि डोळ्याचे पारणे फेडणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तसेच व्हिडीओतील  विहंगम दृश्य पाहून नेटकरी त्याला उत्स्फूर्तपणे शेअरही करत आहेत. (beautiful view of earth and nature from airplane see viral video)

व्हिडीओ कॉकपिट (cockpit) मधून शूट करण्यात आला

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. हा व्हिडीओ कॉकपिट (cockpit) मधून शूट करण्यात आला आहे. वैमानिक ज्या ठिकाणी बसतो, त्या ठिकाणाहून हा व्हिडीओ शूट केल्यामुळे यामध्ये आकाशातून दिसणारे पाणी तसेच ढग मोठ्या शिताफीने टिपण्यात आले आहेत. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कॉकपिटजवळ एक कॅमेरा ठेवण्यात आला आहे. विमान सुरु होण्यापासून ते पुढच्या विमानतळावर उतरण्यापर्यंतचा सगळा घटनाक्रम या कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. वैमानिक विमानात बसला आहे. त्याने विमान सुरु केले असून काही क्षणात तो आकाशात झेपावलाय. व्हिडीओमध्ये सुरुवातीला निळाशार समुद्र दिसतोय. तसेच समुद्रानंतर वैमानिक विमानाला घेऊन पांढऱ्याशुभ्र ढगांमध्ये फिरत आहे. ढगांची दुनिया तसेच निळ्याशार समुद्रात फिरतानाचे सगळे दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे. हा सगळा नजारा पाहून नेटकरी अचंबितच झाले आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओला पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. विमानातील सफर तसेच विमानतून दिसणारे सगळे दृश्य पाहून सगळेच अचंबित झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांच्या या व्हिडीओवरील प्रतिक्रिया तर भन्नाट आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या व्हिडीओला @Aqualady6666 या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video : लग्नाच्या विधीदरम्यान नवरा-नवरीची तुफान मस्ती, व्हिडीओचा शेवट पाहून तुम्हीही खळखळून हसाल

Viral Video : श्वानाला वाचवण्यासाठी मांजर पुढे सरसावली, नेटकरी म्हणाले ‘हीच खरी मैत्री…’

‘आमच्या गुटखा किंगसमोर फिका पडतोय हा मार्वल हिरो’, शांग-चीला पाहून प्रेक्षकांना आली अजय देवगणची आठवण!

(beautiful view of earth and nature from airplane see viral video)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.