सन 1989 मध्ये फक्त इतक्या किंमतीत विकली जायची बिअर, हॉटेलचं 30 वर्षांपूर्वीचं बिल बघून धक्का बसेल
जर तुम्ही 1989 सालची बिअरची किंमत ऐकली तर तुम्हाला वाटेल अरे किती स्वस्त, अशी तर आपण चालता चालता विकत घेऊ शकतो. पण मग अशा ठिकाणी गर्दी पण किती होईल ना?
मुंबई: एक बिअरची बॉटल 1989 साली कितीला असेल? काय वाटतं? लोकं नशेच्या इतक्या आहारी जातात की न परवडणारी बिअरची बॉटलसुद्धा ते विकत घेणं जमवतात. इकडून पैसे घे, तिकडून पैसे घे कसंबसं जमवून लोकं पितातच. पण जर तुम्ही 1989 सालची बिअरची किंमत ऐकली तर तुम्हाला वाटेल अरे किती स्वस्त, अशी तर आपण चालता चालता विकत घेऊ शकतो. पण मग अशा ठिकाणी गर्दी पण किती होईल ना? कल्पना करा की जर तुम्हाला फक्त 33 रुपयांत बिअरची बाटली मिळू लागली तर? आजच्या काळात कुणीच असा विचारही करू शकत नाहीत.
हा किस्सा आहे 30 वर्षांपूर्वीचा! जेव्हा लोक खाण्या-पिण्यासाठी जात असत आणि 100 रुपयांपेक्षा कमी खर्च करत असत.
नुकतेच निवेदिता चक्रवर्ती नावाच्या एका युजरने एका फेसबुक ग्रुपवर जुन्या बिलचे फोटो शेअर केलेत ज्यात ती आणि तिचा पती खाण्या-पिण्यासाठी बाहेर गेले होते. 1989 ची बिले दर्जेदार रेस्टॉरंट्स आणि अलका हॉटेल्सची होती.
बिलांवर बारकाईने नजर टाकली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल.रेस्टॉरंटमधील त्यांचे एकूण जेवणाचे बिल फक्त 196 रुपये होते. त्यांनी खाल्लेल्या अन्नाची किंमतही धक्कादायक होती.
दाल मखणीच्या एका प्लेटची किंमत फक्त 18 रुपये, तर चिकन दोन कांद्याची प्लेट 38 रुपये आहे. एक वाटी रायत्याची किंमत फक्त 28 रुपये आहे.
आजकाल चिप्सचे पॅकेट किंवा पाण्याची बाटली विकत घेतल्यास खिशातून 40 रुपये मोजावे लागू शकतात. बहुतेक कॅफे-बारमध्ये फक्त एका छोट्या स्टार्टरची किंमत 200 रुपयांपेक्षा जास्त असते. 1989 मध्ये निवेदिताने याहीपेक्षा कमी किमतीचं बिल भरलं होतं.
त्याने बिअरच्या बाटलीसाठी फक्त 33 रुपये दिले. आज या किंमतीला बिअर काय, काहीच मिळणार नाही. 2023 मध्ये सर्वात स्वस्त बिअरची किंमत ही किमान 120 रुपये असेल. या किमतींची सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे ही किंमत फक्त 30 वर्षांपूर्वीची आहे. म्हणजेच फक्त गेल्या तीन दशकांमध्ये महागाई खरोखरच गगनाला भिडलीये.