Video : नारी नारीवरच भारी! भररस्त्यात पोरींची तुंबळ हाणामारी, एकमेकींच्या पार झिंज्या उपटल्या…
हा व्हीडिओ hasanadnan या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला अनेकांनी शेअर केलं आहे. या भांडणाची सगळेच नेटकरी मजा घेताना दिसत आहे. त्यामुळे नारीवर केवळ नारीच भारी असं हा व्हीडिओ पाहून म्हणता येईल.
मुंबई : तुम्ही मारहाणीचे अनेक व्हीडिओ पाहिले असतील. त्यातले बरेच व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. यातही जर मुलींची मारहाण असेल तर तो व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात शाळकरी मुलींचे (School Girls Fighting) दोन गट एकमेकांना भिडलेत. बंगळुरूमधील (Bengaluru) एका शाळेसमोर मुलींच्या दोन गटांच्या मारहाणीचा व्हीडिओ सध्या व्हायरल (Viral Video) होतोय. विशेष म्हणजे या मुली शाळेच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. ही घटना कधीची आहे, तसंच भांडणाचं कारण काय आहे, विषयी ठोस माहिती नाही. मात्र या मारहाणीचा व्हीडिओ तुफान व्हायरल होत आहे. ही मारहाण पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी केली होती.
पोरींची दोस्तीत कुस्ती
बंगळुरूमधील एका शाळेसमोर मुलींच्या दोन गटांच्या मारहाणीचा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय. विशेष म्हणजे या मुली शाळेच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. ही घटना कधीची आहे, तसंच भांडणाचं कारण काय आहे, विषयी ठोस माहिती नाही. मात्र या मारहाणीचा व्हीडिओ तुफान व्हायरल होत आहे. ही मारहाण पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी केली होती.
धु-धु धुतलं!
मारहाणीचे वेगवेगळे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यात जर तरूण मुलींची मारहाण असेल तर त्याला अधिक प्रसिद्धी मिळते. सध्या बंगळुरुचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. बेंगळुरूची प्रसिद्ध बिशप कॉटन गर्ल्स स्कूल या शाळेतल्या या विद्यर्थिनी असल्याचं बोललं जातंय. व्हीडिओत शाळकरी मुली एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. तसेच एकमेकीचे केस ओढत मारहाण करताना दिसत आहेत. एका मुलीने तर हातात काठी घेतलीये. एवढी तुफान भांडणं चाललेली दिसल्यावर काहींनी त्यांना थांबण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. या मुली भांडणं करतच राहिल्या.
हा व्हीडिओ hasanadnan या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला अनेकांनी शेअर केलं आहे. या भांडणाची सगळेच नेटकरी मजा घेताना दिसत आहे. त्यामुळे नारीवर केवळ नारीच भारी असं हा व्हीडिओ पाहून म्हणता येईल.