मुंबई: देशात बेरोजगारी कशी वाढत आहे, हे तुम्हाला माहिती असेलच. अभ्यास करून, शिक्षण घेऊनही लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत आणि मिळत असल्या तरी त्यांच्या क्षमतेनुसार मिळत नाहीत. दिल्ली, मुंबईसारख्या शहरांमध्ये लोकांना महिन्याला 8-10 हजार रुपये पगारावर काम करावे लागते, पण त्या पैशातून घर चालवणे किती अवघड आहे. देशात बेरोजगारीची काय स्थिती आहे, हे यावरून समजू शकते की एमबीए असलेल्या लोकांनीही ग्रुप-डी नोकऱ्यांसाठी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. यावर आधारित एक गाणं सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जे खूपच मजेशीर आहे.
बेरोजगारीचं हे गाणं एका व्यक्तीनं अतिशय भन्नाट शैलीत गायलं आहे, ज्याचं भरभरून कौतुकही होत आहे. केवळ सोशल मीडियावरच नाही तर जिथे तो गात होता तिथे मुलांचीही मोठी गर्दी होती. एका जुन्या गाण्याच्या धर्तीवर त्या माणसाने हे गाणं गायलं आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गायकाला किती दाद मिळत आहे. मुले त्याला प्रोत्साहन देताना दिसत आहेत.
हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून त्याला आतापर्यंत 2 लाख वेळा पाहिलं गेलं आहे, तर 7 लाख 27 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक करत विविध मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलं, ‘बरोबर गायला’, तर दुसऱ्या युजरने लिहिलं, ‘इतकं खरं बोलायचं नव्हतं… मी भावुक झालो” त्याचप्रमाणे आणखी एका युजरने लिहिलं, ‘मुलात टॅलेंट आहे आणि त्याच्या गाण्यांमध्ये सत्य आहे’, तर दुसऱ्याने लिहिलं, ‘तु एकदम विद्यार्थ्यांच्या मनातलं बोललास’.