OMG : नवरा एक पण बायका मात्र 40, कुठे झालं हे, काय आहे प्रकरण?
अरवल येथील जात जनगणना कर्मचारी ही नोंदणी पाहून हैराण झाले. तेथे 40 स्त्रियांचा एकच पती असल्याचे समोर आले आहे.
पाटणा : बिहारमधील अरवाल (Bihar) जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. इथे एक पुरुष हा एक-दोन- नव्हे तर तब्बल 40 स्त्रियांचा नवरा (40 women 1 husband) आहे. तुम्हालाही ऐकून आश्चर्य वाटले असेल ना ? पण हे खरं आहे. बिहारमधील जातीनिहाय जनगणनेदरम्यान ही बाब समोर आली आहे. शहरी भागातील रेड लाईट एरिया प्रभाग क्रमांक 7 मध्ये अरवल येथे सुमारे एक पती व 40 पत्नी असे दाम्पत्य अनेक वर्षांपासून राहत असल्याचे सांगण्यात येत आहे.
अशाच एका रंजक जोडीबद्दल सांगणार आहोॉत, ज्यामध्ये पतीच्या जवळपास 40 बायका एकत्र आहेत. आपल्या देशात लग्न हे अत्यंत पवित्र नाते मानले जाते, परंतु हे नाते तेव्हा समोर आले जेव्हा जात जनगणनेच्या वेळी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन त्यांची प्रत्यक्ष पडताळणी करून माहिती मिळवली. तसे, बहुतेक लोक आयुष्यभर एकदाच लग्न करतात आणि जन्मभर एकत्र राहतात. परंतु अरवल येथील हे लग्न हा तर संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.
अरवल येथील जात जनगणना कर्मचारी जेव्हा नगर परिषदेच्या वॉर्ड नंबर 7 रेड लाइट एरियामध्य माहिती गोळा करण्यासाठी पोहोचले तेव्हा तेथील रेकॉर्ड पाहून ते थक्क झाले. जरी ही नोंद पूर्णपणे जात जनगणनेच्या स्वरूपात दिली गेली आहे. रेड लाइट एरियामध्ये अनेक वर्षांपासून गाणे आणि नृत्य करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या नर्तकींचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते. त्यांना इतर कोठेही जागा नाही. त्या स्वतःलाच पती मानतात.
जात जनगणना कर्मचार्याने सांगितले की अशी डझनभर कुटुंबे आहेत ज्यांनी रूपचंद (काल्पनिक नाव) याला पती मानलं आहे. मात्र त्यांनी त्याला ना कधी पाहिलं किंवा तो कधीही त्यांच्याजवळ नव्हता. थोडक्यात त्या स्त्रियांनी स्वतःलाच स्वतःचा पती मानलं आहे.
तसं तर , केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून जात जनगणना करू नये, असे म्हटले होते.