भरधाव वेगात असणारी दुचाकी ट्रकला जाऊन धडकते, पुढे काय होतं? बघा…
अपघाताचे व्हिडीओ आपण अनेकदा बघतो. असे व्हिडीओ सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. बरेचदा तर सहज म्हणून काढला गेलेल्या व्हिडीओमध्ये सुद्धा अपघात झालेला आढळून येतो आणि मग तो व्हिडीओ व्हायरल होतो. हा व्हिडीओ बघा, यात दोन मुले बाईकवर फिरायला चाललेत. ही बाईक पुढे जाऊन एका ट्रकला धडकते. पुढे काय होतं? चमत्कार! बघा व्हिडीओ...
मुंबई: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी गाण्याचे, कधी डान्सचे, कधी कुणावर प्रॅन्क करत असतं तर कधी अजून कसले व्हिडीओ. सोशल मीडिया म्हणजे व्हिडओंचा महासागर आहे. यामध्ये अनेक प्रकार असतात प्राण्यांचे व्हिडीओ, लहान मुलांचे व्हिडीओ, सीसीटीव्ही व्हिडीओ. कधीकधी तर यात अपघाताचे व्हिडीओ सुद्धा व्हायरल होतात. अपघाताचे व्हिडीओ बघून तर आपल्याला धक्काच बसतो. आजकाल कुठे जाऊ तिथे व्हिडीओ काढायची लोकांना सवय आहे. अशात लोक चालत असताना व्हिडीओ काढतात, गाडी चालवत असताना व्हिडीओ काढतात. मग जर गाडीवर जाताना अपघात झाला तर तोही कॅमेऱ्यात कैद होतो. अशाच एका अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होतोय. यात दोन मुलं बाईक राईड करताना दिसलेत.
मुलगा धाडकन बाईक घेऊन खाली
व्हिडीओमध्ये दिसतंय की एक घाट आहे, नागमोडी वळणाचा रस्ता आहे दोन मुले बाईक चालवतायत. एकजण पुढे आणि एकजण मागे आहे. जो मागे गाडी चालवतोय त्याच्याच हेल्मेटला कॅमेरा असावा कारण त्यानेच हा व्हिडीओ शूट केलेला आहे. पुढे बाईक चालवणारा आपल्याच धुंदीत गाडी चालवतोय. समोरून एक ट्रक येतो. हा मुलगा अगदी ट्रकच्या समोर गेला नसला तरीही तो ट्रकला खेटून बाईक चालवतोय. खेटून जाताना त्याला ट्रक इतक्या कट मारतो की तो मुलगा धाडकन बाईक घेऊन खाली पडतो.
View this post on Instagram
धक्कादायक व्हिडीओ
हा व्हिडीओ खूपच धक्कादायक आहे. कुणालाही कल्पना नसताना, खुद्द त्या मुलालाही कल्पना नसावी समोरून ट्र्क येऊन त्याला धडकतो. हे दृश्य शूट करणारा मुलगा, त्याचा मित्र असावा. तो मित्र पुढच्याला खाली पडलेला बघून पटकन गाडीवरून उतरतो आणि त्याच्याकडे धाव घेतो. व्हिडीओच्या शेवटी ज्या मुलाचा अपघात झालाय तो मुलगा सुखरूप असलेला दिसतो. अपघातात त्याची गाडी झुडपात जाऊन पडते. धक्कादायक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय.