Video : दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला!, संवेदनशील डोळे हा व्हीडीओ पाहू शकणार नाहीत…

vibeforvids या अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. या 12 सेकंदाचा व्हीडिओला 5 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिलंय.

Video : दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला!,  संवेदनशील डोळे हा व्हीडीओ पाहू शकणार नाहीत...
अपघाताची भयानक दृश्य
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 6:04 PM

मुंबई : रस्तावर दर मिनिटाला अपघात घडतो. त्याचे काही व्हीडिओही समोर येतात. पण आज ज्या व्हीडिओबद्दल आम्ही बोलतोय. तो व्हीडिओ संवेदनशील डोळ्यांना पाहावणार नाही. या अपघाताची दृश्य तुमच्या डोळ्यात पाणी आणू शकतात. पण या सगळ्यात चांगली बाब एवढीच आहे की या अपघातात (accident) कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे.

अपघाताची दृश्य

सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती गाडी चालवताना दिसत आहे . त्याच्या एक महिला एका लहान मुलीला घेऊन बसली आहे. अचानक मागून एक कार स्कूटरच्या अगदी जवळून जाते. त्याचा या गाडीला धक्का लागतो. त्यामुळे या गाडीवरून ही महिला आणि लहानगी पडते. इतक्यात समोरून एक ट्रक येतो. अन् या दोघी ट्रकच्या चाकाखाली येता येता थोडक्यात बचावतात. पण हा 12 सेकंदाचा व्हीडिओ पाहताना अंगावर काटा येतो. ही भयानक दृश्य डोळ्यांना बघवत नाहीत.

vibeforvids या अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. या 12 सेकंदाचा व्हीडिओला 5 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिलंय.तसंच दोन लाख दहा हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलंय. तर 33 हजारांहून जास्त लोकांनी याला रिट्विट केलंय.

या व्हीडिओवर अनेकांनी कमेंट करत काळजाचा ठोका चुकल्याचं म्हटलंय. एकाने लिहिलंय, आईपेक्षा चांगला संरक्षक कुणीही नाही. तर एकाने लिहिलंय देव तारी त्याला कोण मारी. या दोघीचं नशीब चांगलं होतं म्हणून वाचल्या. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान सोलापूरमध्येही भीषण अपघात झाला होता. यात  5 जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाझार समितीच्या परिसरात हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सोलापूर-हैद्राबाद महामार्गावर ही घटना घडली आहे. अपघातात जखमी झालेल्या पाच जणांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे. महामार्गावर थांबलेल्या ट्रकला कारने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.अपघात शहरानजीक असे भीषण अपघात वाढल्याने चिंतेचा विषय ठरत आहे. सोलापूर-हैदराबाद महामार्गावर वाहनांची नेहमीच मोठी वर्दळ असते, महाराष्ट्र आणि आध्र तेलंगणाला जोडाणारा हा मार्ग असल्याने या महामार्गावर मालवाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असते.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.