मुंबई : रस्तावर दर मिनिटाला अपघात घडतो. त्याचे काही व्हीडिओही समोर येतात. पण आज ज्या व्हीडिओबद्दल आम्ही बोलतोय. तो व्हीडिओ संवेदनशील डोळ्यांना पाहावणार नाही. या अपघाताची दृश्य तुमच्या डोळ्यात पाणी आणू शकतात. पण या सगळ्यात चांगली बाब एवढीच आहे की या अपघातात (accident) कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती गाडी चालवताना दिसत आहे . त्याच्या एक महिला एका लहान मुलीला घेऊन बसली आहे. अचानक मागून एक कार स्कूटरच्या अगदी जवळून जाते. त्याचा या गाडीला धक्का लागतो. त्यामुळे या गाडीवरून ही महिला आणि लहानगी पडते. इतक्यात समोरून एक ट्रक येतो. अन् या दोघी ट्रकच्या चाकाखाली येता येता थोडक्यात बचावतात. पण हा 12 सेकंदाचा व्हीडिओ पाहताना अंगावर काटा येतो. ही भयानक दृश्य डोळ्यांना बघवत नाहीत.
That saving was perfect ? pic.twitter.com/z3MMpJ0v9K
— Vibe 10k ? (@vibeforvids) April 24, 2022
vibeforvids या अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. या 12 सेकंदाचा व्हीडिओला 5 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिलंय.तसंच दोन लाख दहा हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलंय. तर 33 हजारांहून जास्त लोकांनी याला रिट्विट केलंय.
या व्हीडिओवर अनेकांनी कमेंट करत काळजाचा ठोका चुकल्याचं म्हटलंय. एकाने लिहिलंय, आईपेक्षा चांगला संरक्षक कुणीही नाही. तर एकाने लिहिलंय देव तारी त्याला कोण मारी. या दोघीचं नशीब चांगलं होतं म्हणून वाचल्या. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान सोलापूरमध्येही भीषण अपघात झाला होता. यात 5 जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाझार समितीच्या परिसरात हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सोलापूर-हैद्राबाद महामार्गावर ही घटना घडली आहे. अपघातात जखमी झालेल्या पाच जणांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे. महामार्गावर थांबलेल्या ट्रकला कारने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.अपघात शहरानजीक असे भीषण अपघात वाढल्याने चिंतेचा विषय ठरत आहे. सोलापूर-हैदराबाद महामार्गावर वाहनांची नेहमीच मोठी वर्दळ असते, महाराष्ट्र आणि आध्र तेलंगणाला जोडाणारा हा मार्ग असल्याने या महामार्गावर मालवाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असते.
सोलापुरातल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू pic.twitter.com/WZSxMCHkgm
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 25, 2022