Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bike Lifting Video: बाईक डोक्यावर घेतली आणि शिडीने बसवर चढला! व्हिडीओ व्हायरल, खराखुरा बाहुबली

Bike Lifting Video: पण डोक्यावर बाईक उचलणारा माणूस या दोघांपेक्षा जास्त स्ट्राँग दिसत असून हा व्हिडिओ एखाद्या चित्रपटाच्या शूटिंगचा नसून खरा आहे. या माणसाने खरोखरच डोक्यावर बाइक उचललीये.

Bike Lifting Video: बाईक डोक्यावर घेतली आणि शिडीने बसवर चढला! व्हिडीओ व्हायरल, खराखुरा बाहुबली
Bike Lifting VideoImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 5:01 PM

Bike Lifting Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल (Video Viral) होत आहे, ज्यात एक व्यक्ती डोक्यावर बाईक घेऊन जाताना दिसत आहे. इतकंच नाही तर यानंतर तो डोक्यावर घेतलेल्या बाईकच्या मदतीने शिडीच्या सहाय्याने बसच्या छतावर चढतो. बाहुबली (Bahubali) सिनेमात प्रभासला भारी शिवलिंग आणि जॉन अब्राहमला फोर्स चित्रपटात बाईक उचलताना तुम्ही पाहिलं असेल. पण डोक्यावर बाईक उचलणारा (Bike Lifting) माणूस या दोघांपेक्षा जास्त स्ट्राँग दिसत असून हा व्हिडिओ एखाद्या चित्रपटाच्या शूटिंगचा नसून खरा आहे. या माणसाने खरोखरच डोक्यावर बाइक उचललीये.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला

डोक्यावर बाईक उचलून बसच्या छतावर चढणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडिओ शेअर करत ट्विटर युझरने लिहिले आहे की, लोकांची मेहनत, लोकांचा संघर्ष इतरांना तमाशा वाटतो.

त्या व्यक्तीने डोक्यावरील दुचाकी उचलली

डोक्यावर बाईक उचलण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत सुमारे 15 लाख लोकांनी पाहिला असून 5 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. व्हिडिओत दिसत आहे की, हा माणूस आधी डोक्यावर बाईक घेतो आणि मग ती तशीच डोक्यावर घेऊन शिडी चढू लागतो. मग काही सेकंदात तो दुचाकी बसच्या छतावर पोहोचतो.

हाच खरा बाहुबली

या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका युझरने लिहिले की, याला म्हणतात मेहनत करून खाणे

त्याचवेळी आणखी एका ट्विटर युझरने लिहिले की, हाच खरा बाहुबली आहे.

या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना परमहंस नावाच्या युझरने लिहिले की, पोटाची भूक आणि कुटुंबाचं ओझं कोणतंही जोखमीचं काम करू नये, या व्यक्तीच्या आत्म्याला सलाम.

VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक.
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं...
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं....
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं.
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका.
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन.
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक.
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?.