बाईकच्या चाकाला जाळ, स्टंटवर स्टंट! व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Sep 05, 2023 | 4:15 PM

आपण बाईक स्टंटचे बघतो. रोज असे स्टंट सोशल मीडियावर व्हायरल होतच असतात. हे व्हिडीओ बघताना अंगावर काटा येतो. या व्हिडीओ मध्ये तर दुचाकीच्या चाकाला जाळ लागलेला दिसतोय. म्हणजे चाकाला जाळ आणि वर स्टंटवर स्टंट! डोकं चक्रावेल असा हा व्हिडीओ आहे.

बाईकच्या चाकाला जाळ, स्टंटवर स्टंट! व्हिडीओ व्हायरल
bike stunt
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: मुलांना बाईकचं प्रचंड वेड असतं. अनेक मुलं तर आपल्या बाईकलाच आपली गर्लफ्रेंड समजतात, हो ना? असे अनेक व्हिडीओ, फोटो तुम्ही पाहिले असतीलच ज्यात मुलं आपलं बाईकवरचं प्रेम व्यक्त करत असतात. ते आपल्या बाईकला अगदी फुलासारखं जपतात. मुलांचं असं म्हणणं सुद्धा असतं की ते जास्तीत जास्त वेळ आपल्या बाईकसोबत घालवतात. त्यामुळे त्यांचं त्यांच्या बाईककडे विशेष लक्ष असतं. वेळ मिळेल तसा ते त्या बाईकवर पैसा, वेळ खर्च करतच असतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल झालाय. हा व्हिडीओ तुम्ही बघतच बसाल. बाईकच्या चाकातून जाळ बाहेर येताना या व्हिडिओमध्ये दिसून येतोय.

दुचाकी पळवतोय सुसाट

हा व्हिडीओ बघा. या व्हिडिओमध्ये एक मुलगा दुचाकी सुसाट पळवतोय. इतका जोरात तो इकडून तिकडे गाडी पळवतोय की तुमचे डोळे उघडे ते उघडेच राहतील. या गाडीच्या चाकातून तुम्हाला जाळ येताना दिसेल. वेल्डिंग करताना जाळ दिसतो ना एकदम तसा जाळ या बाईकच्या चाकातून दिसतो. बघणाऱ्यालाही कळत नाही की हे नेमकं काय आहे. बाईकवाला इतक्या जोरात येतो की असं वाटतं ही दुचाकी नाही कुठला तरी जाळच आहे. बरं या बाईकच्या चाकात नुसता जाळंच दिसत नाही तर हा माणूस अशा बाईकवर स्टंट सुद्धा मारतोय. हे स्टंट मारताना त्याला जराही भीती वाटत नाहीये.

व्हिडीओ तुम्ही पुन्हा-पुन्हा बघाल

@MadVidss नावाच्या एका अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केलाय. हे असे स्टंट फक्त एक्स्पर्टस करू शकतात. हा व्हिडीओ बघताना तुमच्या अंगावर काटा येईल. आपण रोजच असे बाईकस्टंटवाले व्हिडीओ बघत असतो. पण तुम्ही कधी असा व्हिडीओ पाहिला नसेल ज्यात चक्क बाईकच्या चाकालाच जाळ दिसेल. बघूनच कळेल की हे किती जीवघेणं आहे. व्हिडीओमधला मुलगा दिसत नाही कारण त्याने हेल्मेट घातलेलं आहे. हा व्हिडीओ तुम्ही पुन्हा-पुन्हा बघाल.