मुंबई : विमानातून प्रवास करायला कोणाला आवडत नाही. विमानात बसून उंच हवेत उडण्याचा अनुभव घेण्याचं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. तसं काही लोकांना विमानप्रवास हा नवीन नसतो. हवाई प्रवास करण्याचा अनुभव जेवढा नवा आणि आनंद देणारा आहे, तेवढाच धोकादायकसुद्धा आहे. विमान हवेत झेपावल्यानंतर अचानकपणे मोठ्या दुर्घटना झाल्याच्या अनेक घटना आपण यापूर्वी तुम्ही ऐकल्या असतील. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये फक्त एका पक्षामुळे विमानाला आग लागली आहे. विमानासोबत झालेला हा अपघात थरकाप उडवणारा आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय भीषण आहे. या व्हिडीओमध्ये विमानाला आग लागल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ अमेरिकेच्या न्यू जर्सीतील अटलांटिक सिटीतील आहे. येथे विमानावर एक पक्षी आदळला आहे. पक्षी थेट आदळल्यामुळे विमानाला आग लागली आहे. ही दुर्घटना झाल्याचे समजताच सर्व प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले. वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
अमेरिकेच्या अटलांटिक सिटी एअरपोर्टवर एका विमानाच्या इंजिनवर मोठा पक्षी अचानकपणे आदळला. पक्ष्याने विमानाला जोराची टक्कर दिल्यामुळे इंजिनला मोठी आग लागली. विमान हवेत झेपावणार तोच विमानाला आग लागल्याचे वैमानिकाला समजले. त्यानंतर विमानाचे उड्डाण तत्काळ रोखण्यात आले. तसेच आपत्कालीन सेवेशी संपर्क करुन प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. या विमानात शंभरपेक्षा जास्त प्रवाशी होते.
पाहा व्हिडीओ :
Passengers evacuate Spirit Airlines flight NK3044 on the runway at Atlantic City Airport after the engine caught fire following a bird strike. No injuries reported. https://t.co/0Fe4JyEGfT pic.twitter.com/oMQr79j6Cg
— Breaking Aviation News & Videos (@aviationbrk) October 3, 2021
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याला @aviationbrk या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
इतर बातम्या :
Video | बोटाच्या मदतीने एका क्षणात कापलं टरबूज, माणसाची करामत पाहून नेटकरी अवाक्
Video: दिल्ली-गुरुग्राम रस्त्याच्या ब्रीजखाली एअऱ इंडियाचं विमान अडकलं, नेमकं सत्य काय?
Video: राकेश बापट आणि शमिता शेट्टीचे रोमॅन्टिक रिल्स, व्हिडीओंवर लोकांकडून प्रेमाचा वर्षाव
Skin Care Tips : त्वचेला चमकदार ठेवण्यासाठी ‘या’ खास पध्दतीने साखरेचा वापर करा!https://t.co/aZnPGmdAmF | #Skincare | #Beautytips | #Skincaretips | #Sugar | #Beneficial | #lifestyle |
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 4, 2021