Video | माशाला पकडण्यासाठी पक्ष्याची नामी युक्ती, ब्रेडच्या मदतीने शिकार नेमकी कशी केली ? व्हिडीओ पाहाच
सध्या मात्र, एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका पक्ष्याने माशांना पकडण्यासाठी चांगलंच डोकं लावलं आहे. पक्ष्याच्या या डोकॅलिटीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मुंबई : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपल्याला दु:खही होतं. सध्या मात्र, एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका पक्ष्याने माशांना पकडण्यासाठी चांगलंच डोकं लावलं आहे. पक्ष्याच्या या डोकॅलिटीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (bird use special trick to catch fish video went viral on social media)
माशांना पकडण्यासाठी नामी युक्ती
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक पक्षी दिसत आहे. हा पक्षी त्याची शिकार करण्यासाठी एक नामी युक्ती वापरत आहे. त्याने माशाला पकडण्यासाठी एका ब्रेडच्या तुकड्याचा उपयोग केला आहे. व्हिडीओतील पक्षी आपल्या चोचीमध्ये ब्रेडचा तुकडा घेऊन तो पाण्यात फेकत आहे. ब्रेडचा तुकडा पाहून मासे त्या पक्षाकडे येत आहे. याच माशांना पकडण्याचा हा पक्षी प्रयत्न करत आहे.
व्हिडीओमध्ये काय आहे ?
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पक्षी पाण्यात ब्रेडचा तुकडा फेकत आहे. ब्रेड पाहून मासे पक्ष्याकडे धावत येत आहेत. सुरुवातीला आपल्याला दोन मोठे मासे पक्ष्याकडे येताना दिसत आहेत. मात्र, ते फारच मोठे असल्यामुळे पक्षी फेकलेला ब्रेडचा तुकडा लगेच उचलून घेत आहे. नंतर पुन्हा हा तुकडा फेकून देत छोटा मासा जवळ येण्याची तो वाट पाहत आहे. शेवटी एक छोटा मासा त्याच्याकडे आल्याचे आपल्याला दिसत आहे. जवळ आलेल्या माशाला पक्ष्याने चलाखीने पकडले आहे.
पाहा व्हिडीओ :
Bird fishing with a piece of bread ? pic.twitter.com/M9iz4Ubhpu
— Incredible Nature ? (@living0nearth) July 25, 2021
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला Incredible Nature या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.
इतर बातम्या :
Video | हळदी समारंभात धम्माल, महिलांसोबत काकांचा मजेदार डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच
Video | लखनऊ नंतर ‘पानिपत गर्ल’चा कारनामा, कारचालकाला भररस्त्यात मारहाण, व्हिडीओ व्हायरल
Video : नवऱ्याच्या मित्राने दिलेलं गिफ्ट उघडताच नवरी लाजली; नेमकं काय घडलं पाहाच!
(bird use special trick to catch fish video went viral on social media)