Video: देव करो आणि हा व्हिडीओ खोटा ठरो, बर्थ डे बंम्पज देताना ‘तो’ गुदरमला, हादरवणारा व्हिडीओ

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ कुठला आहे हे माहित नाही, पण यामध्ये जे घडलं ते अतिशय भयानक आहे. या व्हिडीओची सत्यता अद्याप पडताळली गेलेली नाही, मात्र, असं असलं तरी अशा अनेक घटना अनेकदा घडल्या आहे, ज्यात नाहक कुणीतरी बळी पडलं आहे.

Video: देव करो आणि हा व्हिडीओ खोटा ठरो, बर्थ डे बंम्पज देताना 'तो' गुदरमला, हादरवणारा व्हिडीओ
बर्थ सेलिब्रेशनदरम्यान बर्थ डे बॉय बेशुद्ध
Follow us
| Updated on: Nov 30, 2021 | 5:11 PM

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वाढदिवसाचं सेलिब्रेशन एकाच्या जीवावर कसं बेतलं हे दिसत आहे. केक तोंडावर फासून वेगळ्याच पद्धतीने वाढदिवस साजरं करण्याचं फॅड सध्या सगळीकडे पाहायला मिळतं, यामध्ये केक खाण्यासाठी नाही तर तोंडाला फासण्यासाठी त्याचा वापर होतो. पण हीच गोष्ट एकाच्या जीवावर बेतली आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ कुठला आहे हे माहित नाही, पण यामध्ये जे घडलं ते अतिशय भयानक आहे. या व्हिडीओची सत्यता अद्याप पडताळली गेलेली नाही, मात्र, असं असलं तरी अशा अनेक घटना अनेकदा घडल्या आहे, ज्यात नाहक कुणीतरी बळी पडलं आहे. (Birthday boy dies while giving birthday bumps, shocking video goes viral)

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे, 21 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 10 वाजे दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला तुम्हाला रत्यावर 2 गाड्या लागलेल्या दिसतील, ज्यात एक मोपेड गाडी आहे तर एक स्प्लेंडर आहे, रस्तावर 4 जण उभे आहेत, तेवढ्यात इथं दोघे गाडीवर बसून येतात, त्यातील मागे बसलेल्या तरुणाचा वाढदिवस असल्याचं कळतं आहे. जसा तो तरुण गाडीवरुन उतरतो, सगळे मित्र त्याला घेरतात, त्यातील एकजण आपल्या मोपेडवर ठेवलेला केक गाडीच्या सीटवर ठेवतो आणि तो केक उघडला जातो. त्यानंतर पेपरबॉम्ब फोडला जातो, त्यातील काहीजणँ नाचायला लागतात, बर्थ डे बॉय केक कापायला लागतो, आणि तितक्याच्या त्याच्या उजव्या बाजूला असलेला मित्र, त्याचं तोंड थेट केकवर आपटतो. बाकी मित्रही केकवर त्याचं तोंड घासू लागतात. त्यानंतर केक हाताने उचलून बर्थ डे बॉयच्या तोंडाला लावला जातो.

त्यानंतर मित्राला खोटं खोटं मारण्याचा प्रकार सुरु होतो. त्यानंतर सगळे मिळून वाढदिवस असलेल्या मित्राला उचलतात, आणि त्याच्यासोबत सेलिब्रेशन सुरु करतात. त्याला खोटं खोटं मारण्याचा प्रकार करतात. बर्थ डे बंम्प्स देणं सुरु होतं. पण, तोपर्यंत बर्थ डे बॉयने हात पाय सोडलेले असतात. तो बेशुद्ध झालेला असतो. या मित्राचं पुढं काय झालं हे माहित नाही.

पाहा व्हिडीओ:

पण नक्की काय झालं असेल?

एक्साईटमेंटमध्ये अवधानाने मित्र केकमध्येच तोंड दाबतात. इथेच मोठी चूक होते. एकजण केकमध्ये तोंड दाबून ठेवतो. त्यामुळे केक नाका तोंडात जातो. त्यामुळे श्वसन नलिका बंद होते. आणि त्याचवेळी कोणी डोक्यात अंडी फोडतात.तर कोणी अंगावर पीठ टाकतात. बरं त्याने पळून जाऊ नये म्ह,णून त्याला घट्ट धरून बसतात. त्यामुळे त्यालाही हालचाल करता येत नाही आणि तो बर्थडे बॉय गुदमरून जातो.

कुत्रं आलं, त्याने पाहिलं आणि पळ काढला!

कुठलीही वाईट गोष्ट होणार असेल तर त्याची सर्वात आधी चाहूल ही प्राण्यांना लागते असं म्हटलं जातं, असाच काहीचा प्रकार या व्हिडीओतही पाहायला मिळतो आहे, जेव्हा हे मित्र बर्थ बॉयला उचलतात, आणि केक फासतात, तेव्हा तिथं एक कुत्र येतं, ते हा सगळा प्रकार पाहतं, थोडा वेळ शांतपणे उभं राहतं, पण जसा हा तरुण बेशुद्धीत जात असतो, तसं ते कुत्रं तिथून पळ काढतं. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही ही गोष्ट प्रकर्षाने पाहू शकता.

हा प्रकार कुठे घडला, कधी घडला, कसा घडला हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण देव करो आणि हा बर्थ डे बॉय व्यवस्थित असो हीच आशा. पण, या व्हिडीओनंतर तरी आपल्याला हे समजायला हवं की, जन्मदिवस साजरं करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. अशाप्रकारे ओढाताण करुन, ओरबडून वाढदिवस साजरा केला तर त्यात जीवाचा धोका अधिक आहे.

हेही पाहा:

Viral: लहान मुलांचा हा व्हिडीओ तुम्हाला भावनिक केल्याशिवाय राहणार नाही, पाहा व्हिडीओ

स्टंट करण्याच्या नादात तोंडावर आपटला, व्हिडीओ पाहून नेटकरी हादरले, पाहा धक्कादायक Video

 

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.